वंचित बहुजन आघाडीने चार जागा लढवाव्या -जयंत पाटील

टीम महाराष्ट्र देशा – वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक संयुक्त पत्र लिहिले आहे. याबाबत जयंत पाटील यांनी ट्विट केले आहे.

पत्रात म्हंटले आहे की, आपल्यासोबत वेगवेगळ्या स्तरावर अनेकवेळा प्रत्यक्ष व समविचारी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण महाघाडीत येण्यासंदर्भात चर्चा केली. यामध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडीने चार जागा लढवाव्या असा मनोदय व्यक्त केला.

Loading...

तसेच देशभरात लवकरच लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील. आतापर्यंत भाजपा प्रणीत मोदी सरकारचा कारभार पाहिल्यावर लक्षात येते की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान डावलून या देशामध्ये पूर्णपणे मनमानी कारभार सुरु आहे. देशातील अल्पसंख्यांक, दलित, आदिवासी आणि बहुजन समाजावर वेगवेगळ्या प्रकारे अन्याय, अत्याचार केला जात असल्याचे ही या पत्रात म्हटले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे रक्षण करण्यासाठी आणि देशातील लोकशाहीच्या रक्षणासाठी ही लढाई आपण सर्वजण आघाडी करून एकत्र लढूया, अशी विनंती या पत्राद्वारे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रकाश आंबेडकर यांना विनंती केली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
'हिंसक वळण लावणारे, तोडफोड करणारे कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीचे नाहीत'
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
...तर भाजप - मनसे एकत्र येऊ शकतात; पाटलांनी दिले युतीचे संकेत
मनसेच्या संघटना बांधणीची जबाबदारी बारामतीकराच्या खांद्यावर
'एमआयएम'ने आजपर्यंत सगळ्यांनाच शिंगावर घेतलयं, मनसेला घाबरत नाही