वंचित आघाडी ३० जुलैला करणार उमेदवारांची पहिली यादी जाहीर

blank

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. तर या मोर्चेबांधणीत वंचित आघाडीने बाजी मारली असून उमेदवारांची पहिली यादी ३० जुलैला जाहीर होणार आहे. लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी मतदारांना वंचित आघाडीकरत तिसरा पर्याय निर्माण उपलब्ध करून दिला होता. मात्र याचा फटका कॉंग्रेस आघाडीला बसला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत देखील वंचित आघाडीचा फटका कॉंग्रेस आघाडीला बसणार असल्याची शक्यता आहे.

येत्या ३० जुलैला वंचित आघाडी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहे. या यादीत नव्या दमाच्या उमेदवारांचा समावेश असणार असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत वंचीतच्या उमेदवारांनी तिसऱ्या क्रमांकाची मत मिळवली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत नक्कीचं उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास वंचित आघाडीच्या नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडी ही कॉंग्रेस आघाडीला अडसर ठरली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडीला कॉंग्रेस आघाडीत घेण्याचा प्रस्ताव कॉंग्रेसकडून मांडण्यात आला होता. मात्र कॉंग्रेसच्या प्रस्तावावर वंचीत आघाडी फारशी इच्छुक नसल्याच दिसत आहे. त्यामुळे वंचित आघाडी विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढणार असल्याच जवळपास निश्चित झाल आहे.