‘आधी दिल्लीची परवानगी घ्या मगच आघाडीचे बोला’, ‘वंचित’चा पटोलेंना टोला

nana patole - prakash aambedkar

अकोला : कॉंग्रेसचे प्रदेशध्यक्ष नाना पटोले यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्याशी जुळून घेण्याचे संकेत दिले आहे. प्रकाश आंबेडकरांशी आघाडीच्या दृष्टीने चर्चा करणार असल्याचं मोठं वक्तव्य काँग्रेस नाना पटोलेंनी केलं आहे.

धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन टाळण्यासाठी आंबेडकरांशी चर्चा करणार असल्याचं पटोले म्हणालेत. काही छोट्या पक्षांशीही आघाडीसंदर्भात चर्चा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, सध्या आंबेडकरांशी कोणतीही चर्चा सुरू नसल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे. नुकतेच अकोल्यात पटोलेंनी हे विधान केले होते. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून नाना पटोले यांना टोला लगावण्यात आला आहे.

काँग्रेस व वंचित बहूजन आघाडी या दो पक्षामध्ये आघाडी करण्याबाबतच्या अनेक चर्चा माध्यमांमध्ये होत असतात काँग्रेसचे नेते आघाडीबाबत वक्तव्यही करतात मात्र आघाडीसाठी काँग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांनी ठेवलेल्या प्रस्तावाला केंद्रीय नेतृत्व मान्यता देत नाही हा इतिहास आहे. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आधी दिल्लीची परवानगी घ्यावी नंतरच वंचित सोबत आघाडीची चर्चा करावी असा सल्ला वंचित बहूजन आघाडीचे उपाध्यक्ष डॉ. धैयवर्धन पुंडकर यांनी पटोले यांना दिला आहे.

प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेऊन निवडणुक लढविण्याबाबत यापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी अनेक प्रयत्न केले मात्र त्यांच्या प्रयत्नांना केंद्रातून प्रतिसाद मिळालेला नाही. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण या दोन्ही नेत्यांनी वंचित सोबत आघाडीबाबत प्रस्ताव ठेवला होता. आम्ही सकारात्मकच होतो. मात्र, राज्यातील कॉंग्रेसच्या नेत्यांच्या प्रस्तावाला केंद्रीय नेत्यांनी कधीच मान्यता दिली नाही आताही पटोले आघाडीबाबत बोलत असतील तर पुन्हा मागच्या प्रमाणेच इतिहास उगाळला जाऊ नये म्हणून त्यांनी सावध होऊन आधी दिल्लीची परवानगी घ्यावी. असं देखील डॉ. धैयवर्धन पुंडकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

IMP