व्हॅलेंटाईन डे: विद्यापीठात फिरकलास तर कारवाई

lucknow university

लखनऊ: आज व्हॅलेंटाईन डे निमित्त तरुण-तरुणी आनंदात आहेत. मात्र देशात एकीकडे बजरंग दल कडून व्हॅलेंटाईन डे’ला देशभर विरोध आहेत. तर आता लखनऊ विद्यापीठाने व्हॅलेंटाइन डे’ला विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या आवारात फिरू नये, असे पत्रक प्रसिद्ध केल्यामुळे देशभर चर्चेचा विषय बनला आहे.

व्हॅलेंटाईन डे आणि महाशिवरात्री एकाच दिवशी आले आहेत. आल्यामुळे विद्यापीठाने हा आदेश काढला आहे. पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात असून यासाठी तरुणाई विद्यापीठाच्या आवारात जमतात आणि व्हॅलेंटाईन डे उत्साहात साजरा करतात मात्र यावर्षी १४ फेब्रुवारीला महाशिवरात्री आल्याने विद्यापीठाला सुट्टी देण्यात आली आहे. या काळात कोणत्याही अभ्यासक्रमांचे वर्ग आणि प्रयोग परीक्षा होणार नाहीत. त्यामुळे या काळात विद्यापीठाच्या परिसरात कोणालाही प्रवेश नसेल. पालकांनीही त्यांच्या मुलांना विद्यापीठाच्या आवारात पाठवू नये. या काळात कोणताही मुलगा किंवा मुलगी विद्यापीठाच्या परिसरात फिरताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे विद्यापीठाकडून ठणकावून सांगण्यात आले आहे.