Valentine Day | जोडीदारासोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी ‘ही’ ठिकाणं ठरू शकतात सर्वोत्तम

Valentine Day | टीम कृषीनामा: व्हॅलेंटाईन डे हा जोडप्यांसाठी खूप खास दिवस असतो. या दिवशी जोडपे प्रेम व्यक्त करतात. हा दिवस खास बनवण्यासाठी लोक वेगवेगळे प्रकारचे पर्याय शोधत असतात. तर बहुतांश जोडपे हा दिवस साजरा करण्यासाठी ट्रीप प्लॅन करतात. तुम्ही पण जर तुमच्या जोडीदारासोबत शांत वेळ घालवायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला व्हॅलेंटाईन डे स्पेशल ट्रीपसाठी काही ठिकाणांबद्दल माहिती सांगणार आहोत. या रोमांटिक ठिकाणांवर तुम्ही तुमचा व्हॅलेंटाईन डे सर्वोत्तम पद्धतीने साजरा करू शकतात. तुम्ही व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने पुढील ठिकाणांना भेट देऊ शकतात.

उदयपूर (Celebrate your Valentine Day in Udaipur )

राजस्थानमध्ये स्थित असलेले उदयपूर शहर एक रोमँटिक ठिकाण आहे. या शहराला तलावांचे शहर असे देखील म्हणतात. उदयपूरमध्ये तुम्हाला सुंदर राजवाडे, तलाव, मंदिर आणि राजस्थानची संस्कृती बघायला मिळेल. या ठिकाणी तुम्ही पिचोला तलावावर बोटीत प्रवास करत तुमच्या व्हॅलेंटाईन डे साजरा करू शकतात. त्याचबरोबर उदयपूरमध्ये तुम्ही तलावाच्या किनारी बसून कॅण्डल लाईट डिनर करू शकतात. उदयपूरमध्ये तुम्हाला तुमचा व्हॅलेंटाईन डे उत्तम पद्धतीने साजरा करता येऊ शकतो. त्याचबरोबर येथे तुम्ही सज्जनगड किल्ला, फतेह सागर तलाव, विंटेज कार म्युझियम, इकलिंग्जी मंदिर, दूध तलाई म्युझिकल गार्डन, जैसामंद तलाव पाहू शकतात.

आग्रा (Celebrate your Valentine Day in Agra)

उत्तर प्रदेशात स्थित असलेल्या आग्र्याचे ताजमहल हे प्रेमाचे प्रतीक आहे. त्यामुळे व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी आग्रा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. प्रेमाचे प्रतीक असलेल्या या चित्तथरारक वास्तुकलेच्या सानिध्यात तुम्ही तुमच्या जोडीदारांसोबत हा व्हॅलेंटाईन डे साजरा करू शकतात. आग्र्याच्या ताजमहालजवळ तुम्ही सुंदर सूर्यास्तासोबत उत्तम अनुभव घेऊ शकतात.

गोवा (Celebrate your Valentine Day in Goa)

रोमँटिक डेस्टिनेशनच्या यादीमध्ये गोव्याचे नाव अग्रस्थानी आहे. गोव्यामध्ये असलेले सुंदर समुद्रकिनारे बॅकवॉटर आणि संस्कृती प्रत्येकाचे मन जिंकून घेते. हा व्हॅलेंटाईन डे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत गोव्याच्या क्रूजमध्ये साजरा करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही गोव्याच्या जुन्या चर्चला भेट देऊन, तुमच्या जोडीदारासोबत त्याठिकाणी सर्वोत्तम क्षण घालवू शकतात. गोव्यामध्ये तुम्ही जुना गोवा, फॉन्टेनहास, अंजुना फ्ली मार्केट, अर्पोरा शनिवार रात्री बाजार, म्हापसा मार्केट, वागेटोर बीच, वॅगेटर हिलटॉप या ठिकाणांना भेट देऊ शकतात.

अलेप्पी (Celebrate your Valentine Day in Alleppey)

केरळमध्ये स्थित असलेले अलेप्पी हे एक सुंदर शहर आहे. या ठिकाणाला भारताचे व्हेनिस म्हणून ओळखले जाते. केरळमधील हे ठिकाण अतिशय मोहक आणि रोमँटिक आहे. अलेप्पीत हाऊस बोटीमध्ये तुम्ही तुमच्या जोडीदारासह व्हॅलेंटाईन डे साजरा करू शकतात. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला शांत समुद्रकिनारे बॅकवॉटर इत्यादी ठिकाणी जोडीदारासोबत व्हॅलेंटाईन डेचा आनंद घेता येईल. अलेप्पी हे केरळमधील सर्वात जुने बॅकवॉटर शहर आहे. हे ठिकाण समुद्रकिनारी असलेल्या अनेक नद्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि अनेक कालवे, बॅकवॉटर, समुद्रकिनारे आणि सरोवरांचे घर आहे.

महत्वाच्या बातम्या

Lemon Benefits | वजन कमी करण्यापासून ते इम्युनिटी पॉवर वाढवण्यापर्यंत ‘हे’ आहेत लिंबाचे अनोखे फायदे

Besan & Honey Face Pack | बेसन आणि मधाचा फेस पॅक वापरून करा त्वचेच्या ‘या’ समस्या दूर

PM Kisan Yojana | शेतकऱ्यांनो ही आहे शेवटची संधी! लवकरात लवकर बँक खाते आणि आधार कार्ड करून घ्या लिंक

Job Vacancies | नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Eye Care | डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आहारात करा ‘या’ ज्यूसचा समावेश

 

Back to top button