वैष्णवी जाधव, निकिता लिपणे व उर्मिला धुमाळचे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत सुयश

कुस्ती स्पर्धा

अहमदनगर: नाशिक विभागीय क्रीडा संकुल आयोजित ”चला खेळू” या उपक्रमाअंतर्गत कोकमठाण येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत त्रिमूर्ती कुस्ती केंद्राची विद्यार्थिनी वैष्णवी जाधव हिने जिल्हास्तरीय स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवला. तसेच नांदूर शिकारी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी निकिता लिपणे हिने सुवर्ण पदक आणि उर्मिला धुमाळ या विद्यार्थिनीने रौप्यपदक पटकावत दैदिप्यमान कामगिरी केली आहे.

वैष्णवी जाधव हीने ३० किलो वजन गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अंतिम फेरीत मजल मारत द्वितीय क्रमांक पटकावला. नांदूर शिकारी जिल्हा परिषद शाळेत आठवीत शिक्षण घेत असलेली निकिता भीमराज लिपणे हिने ३८ किलो वजन गटात चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. तर उर्मिला बबन धुमाळ या विद्यार्थीनीने रौप्य पदक मिळवले. विध्यार्थीनिंना त्रिमूर्तीचे क्रीडा प्रशिक्षक संभाजी निकाळजे, मुख्याध्यापक दत्तात्रय घुले, सौ.सुनीता पाचेगावकर, सौ.आशा माने, अध्यापक पंढरीनाथ काशीद, लक्ष्मण गायकवाड, नामदेव धायतडक , अंबादास बोरुडे ,गोपाळ राऊत, अंकुश नवले, रवींद्र पवार सचिन लिपणे यांनी मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी स्पर्धेत यश मिळवल्याने आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी अभिनंदन केले आहे. व सर्वच स्थरातून कौतुक होत आहे.