10 कोटी नोटा प्रकरणाची सखोल चौकशी करा -धनंजय मुंडे

16 डिसेंबर : मुंबईतल्या टिळकनगरमध्ये कारमध्ये सापडलेल्या 10 कोटींच्या नोटांच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केलीये.

या बँकेची मुख्य शाखा परळी वैजनाथ, बीड येथे असताना इतकी मोठी रक्कम मुंबईला नेण्याचे कारण काय? बँकेची रक्कम बँकेच्या गाडीतून घेऊन जाण्याऐवजी ती खाजगी गाडीतून घेऊन का नेण्यात आली? एवढी मोठी रक्कम घेऊन जात असताना सुरक्षा रक्षकाची गरज का भासली नाही?, असे प्रश्न मुंडे यांनी उपस्थित केले.

तसंच बँकेत 10 कोटींच्या ठेवी तरी आहेत का असा सवालही मुंडे यांनी उपस्थित केलाय. बँकेचे चेअरमन हे सावकार असल्याचा आरोपही धनंजय मुंडेंनी केलाय.

त्यातली 10 कोटीची रक्कम जुन्या नोटांमध्ये आहे. तर 10 लाख रुपयांची रक्कम 2 हजाराच्या नव्या नोटांमध्ये आहे.

एकीकडे भाजप स्वतः चा काळा पैसा पांढरा करतंय. आणि दुसरीकडे सामान्य माणूस तासंतास रांगेत उभ राहून त्रास सहन करतोय. सरकारने याची चौकशी करावी, असंही धनंजय मुंडे म्हणाले.