वैद्यनाथ दुर्घटना : उपचारादरम्यान एकाचा मृत्यू; मृतांची संख्या ७ वर

vaijnath-sugar-factory

टीम महाराष्ट्र देशा : परळी येथील वैद्यनाथ साखर कारखान्यातील दुर्घटनेतील मृतांच्या संख्येत वाढ होऊन ती ७ वर पोहोचली आहे. उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाला. धनाजी देशमुख असे मृत व्यक्तीचे नाव असून ते कारखान्यात अभियंता पदावर कार्यरत होते.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील रसाची टाकी फुटून १२ कर्मचारी भाजले होते. त्यातील सात जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. उर्वरीत जखमींवर उपचार सुरू आहेत.

मृतांमध्ये सुभाष कराड, सुमीत भंडारे, सुनील भंडारे, गौतम घुमरे, मधुकर आदनाक, रामराव नागरगोजे आणि धनाजी देशमुख यांचा समावेश आहे.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या  दुर्घटनेतील मयत कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना सहा लाख आणि जखमींना दिड लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. कारखान्यातर्फे तीन लाख,  मुख्यमंत्री सहायता निधीतून दोन लाख रुपये व अध्यक्षा ना. पंकजाताई मुंडे यांच्या वतीने वैयक्तिक एक लाख असे एकूण सहा लाख रुपये आणि जखमींना  दीड लाख रुपये मदत देण्याची घोषणा राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा कारखान्याच्या अध्यक्षा ना. पंकजाताई मुंडे यांनी  केली.