Bhetali Tu Punha- ‘भेटली तू पुन्हा’चं पहिलं पोस्टर रिलीज

मुंबई: अभिनेता वैभव तत्ववादी आणि अभिनेत्री पूजा सावंत या जोडीच्या आगामी ‘भेटली तू पुन्हा’ या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.‘भेटली तू पुन्हा’ हा सिनेमा एक रोमॅंटिक सिनेमा असल्याचं पोस्टरवरून आणि टायटलवरुन दिसतंय.

चंद्रकांत कणसे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत, सिनेमाचं लेखन संजय जामखंडी यांनी केलंय. तर गणेश रामदार हजारे यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. येत्य २८ जुलैला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

 

प्रवास तुझ्या सोबतीचा सुरु झाला नवा
जगाचे ना राहिले भान, जेव्हा भेटली तू पुन्हा !
सादर आहे “भेटली तू पुन्हा “चे पोस्टर !
#Poster #BhetaliTuPunha #28July Vaibhav Tatwawaadi Pooja Sawant Chandrakant Kanse