राजपथावर झळकणार महाराष्ट्राच वैभव

सादर होणार शिवराज्याभिषेका वर आधारित चित्ररथ

टीम महाराष्ट्र देशा : यावर्षी राजपथावर प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्यावतीने ‘शिवराज्याभिषेका’ वर आधारित चित्ररथ सादर होणार आहे. प्रजासत्ताक दिनी इंडियागेट वरील राजपथावर महाराष्ट्रासह 14 राज्यांचे चित्ररथ प्रदर्शित होणार आहेत. शिवराज्याभिषेक चित्ररथ बांधणीसाठी प्रसिध्द कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या नेतृत्वाखालील चमू दिल्लीत दाखल झाला आहे.

देशभरातून २९ राज्यांनी प्रजासत्ताक दिनी राजपथावरील चित्ररथ प्रदर्शनासाठी दावेदारी केली होती. मात्र विविध चाचण्यानंतर महाराष्ट्रासह १४ रथांची निवड या कार्यक्रमासाठी करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या या गौरवपूर्ण रथावर रायगड किल्यावर असलेली ‘मेघडंबारी’ उभारण्यात येणार आहे. तसेच शिराज्यभिषेक दर्शविण्यासाठी प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिकाही साकारली जाणार असून एकूण १० कलाकार असतील. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगौरव वर्णन करणाऱ्या गीतांची धूनही राजपथावर या चित्ररथासह सादर होणार आहे.

महाराष्ट्राने आतापर्यंत राजपथावर उल्लेखनीय रथ सदर केले आहेत त्यामध्ये १९८० मध्येही राज्याच्यावतीने ‘शिवराज्याभिषेक’ दर्शविणारा चित्ररथ प्रदर्शित करण्यात आला होता त्याला प्रथम पारितोषक मिळाले होते. १९८३ मध्ये ‘बैल पोळा’ या चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला होता. नंतर सलग तीन वर्ष महाराष्ट्राला प्रथम क्रमांकाचा मान मिळाला होता. तसेच मध्ये प्रदर्शित ‘पंढरीची वारी’ या चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला. यावर्षी महाराष्ट्राच गौरव पुन्हा एकदा झळकणार आहे.

You might also like
Comments
Loading...