fbpx

मराठी भाषा भवनाच्या प्रश्नावर शिवसेना गप्प का : विजय वडेट्टीवार

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर विरोधक विविध मुद्द्यांवरून सरकारवर टीका करताना दिसत आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठी भाषा भवनाच्या प्रश्नावरून शिवसेनेवर टीका केली आहे.

मराठी अस्मितेचे राजकारण करणारी शिवसेना मराठी भाषा भवन मुंबईतच व्हावे यासाठी आग्रही असल्याचे दिसत नाही. इतरवेळी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे, असा गळा शिवसेना काढत असते. मग मराठी भाषा भवनाच्या प्रश्नावर शिवसेना गप्प का बसली आहे? असा सवाल वडेट्टीवार यांनी शिवसेनेला विचारला आहे. तसेच पुढे बोलताना सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेनेने मराठी भाषा भवन मुंबईबाहेर हलवू देणार नाही, यासाठी आग्रह धरला पाहिजे. पण शिवसेना फक्त मतांसाठी मराठीचा वापर करते. मराठी भाषा भवनासाठी मुंबईत एक इमारत उपलब्ध करून देता येत नसेल तर शिवसेनेला मराठी-मराठी करण्याचा अधिकार नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.

दरम्यान मराठी भाषा भवन मुंबईत उभारून भाषा संचालनालय, साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोष निर्मिती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था ही सर्व कार्यालये एकाच छताखाली आणणे महत्वाचे आहे असंही वडेट्टीवार म्हणाले.