वडा पाव, बुर्जी-पाव गाडी चालकांची दादागिरी

डोंबिवली  : बेकायदेशीररित्या उभ्या असलेल्या वडा बुर्जी-पाव पावच्या गाड्या हटवण्यास सांगितल्याने सबंधित गाडी चालकाने पोलीस कर्मचाऱ्यास अरेरावीची भाषा करत शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. याप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात राजू माटा व आदेश गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे.

डोंबिवली पूर्वेकडील सार्वजनिक रस्त्यावर राजू माटा हा वडा-पावचे दुकान लावतो. काल रात्रीच्या सुमारस पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना दुकान बंद करण्यास सांगितले. त्यावेळी संतापलेल्या राजूने या कर्मचाऱ्याला माझे दुकान बंद करायचे नाही, किती पैसे पाहिजेत ते सांग असे बोलत शिवीगाळ करत धक्काबुक्की केली.

याप्रकरणी पोलीस ठाण्यात राजू माटा विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तर दुसरी घटना मधुबन टॉकिजच्या परिसरात घडली. या ठिकाणी आदेश गायकवाड नावाचा इसम बुर्जी-पावचे दुकान लावतो. काल रात्री एक वाजण्याच्या सुमारस पोलिसांनी त्याला दुकान बंद करण्यात सांगितले असता त्याने पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत आदेशला अटक केली आहे