‘लस, ऑक्सिजन आणि पीएम मोदीही देशातून गायब!’, राहुल गांधींची बोचरी टीका

rahul gandhi

नवी दिल्ली : देशभरात लसींचा तुटवडा जाणवत असल्याने अनेक राज्यांनी १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण बंद करण्याचा निर्णय घेतल आहे. यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या सर्वांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी करोनावरील लसींचा तुटवडा आणि सेंट्रल विस्टा प्रकल्पावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

‘लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधान सुद्धा गायब आहेत. बाकी आहे तर फक्त सेंट्रल विस्टा, औषधांवर जीएसटी आणि जिथे तिथे पंतप्रधानांचे फोटो’, असे ते आपल्या ट्विटमध्ये म्हणालेत.

दरम्यान, देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नवे संकट उभे ठाकले आहे. या स्थितीत केंद्र सरकारने मोफत लसीकरण मोहीम राबवावी, सेंट्रल व्हिस्टासारख्या प्रकल्पासाठी खर्च केली जात असलेली रक्कम हे काम थांबवून आरोग्य क्षेत्रासाठी वापरावी, बेरोजगारांना मासिक ६ हजार रुपये द्यावेत, अशा एकूण ९ मागण्यांचे खुले पत्र १२ विरोधी पक्षांनी पंतप्रधानांना लिहिले आहे.

या खुल्या पत्रावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह १२ विरोधी पक्षनेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. लसीकरणासाठी ३५ हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणीही यात आहे. विरोधी पक्षांनी यापूर्वीही काही सल्ले दिले होते. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याचे परिणाम आता देश भोगत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP