पेटीएम अ‍ॅपद्वारे लसीकरण स्लॉट करता येणार बुक

पेटीएम

नवी दिल्ली :  सध्या देशात अनेजण कॅशलेस व्यवहार करत आहे. त्यामुळे अनेक लोक पेटीएम, गुगल पे या सारख्या अ‍ॅपचा वापर करत आहेत. अशातच आता पेटीएमने एक नवीन सोय यूजर्ससाठी आणली उपलब्ध केली आहे. पेटीएमने यूजर्ससाठी अ‍ॅपवर उपलब्ध स्लॉट शोधण्याशिवाय लसीकरणासाठी अप्वॉइंटमेंट बुक करू शकणार आहेत.

कोव्हिनचे प्रमुख आर एस शर्मा यांनी सांगितले की, पेटीएम मेक माय ट्रिप आणि इन्फोसिस यासारख्या मोठ्या डिजिटल कंपन्यांसह अनेक संस्था लस बुकिंगसाठी मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर पुढे कंपनीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  ही सेवा भारतीयांना लसीकरण स्लॉट बुक करण्यास आणि रोग प्रतिकारशक्ती मिळविण्यास आणि सध्याच्या साथीच्या रोगाचा प्रतिकार करण्यास मदत करेल.

पेटीएमने अ‍ॅपवर मे मध्ये व्हॅक्सिन फाइंडर फीचर लाँच केले आहे, जे वापरकर्त्यांना लस बुकिंगसाठी लीड शोधण्यात मदत करते, यामध्ये उपलब्ध असलेल्या लसीचा प्रकार आणि त्यासाठी लागणाऱ्या फी यासारख्या माहितीचा समावेश आहे.

लसीकरण स्लॉट बुक करण्यासाठी असे करा- 

  • सर्वप्रथम पेटीएम अॅप ओपन करा. जर तुमचं पेटीएम लॉगिन नसेल तर लॉग इन करा.
  • त्यानंतर तुम्हाला Feature सेक्शनमध्ये Vaccine Finder चा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक करा.
  • एक नवं पेज सुरू होईल. त्या ठिकाणी तुम्ही तुमचा पिन कोड किंवा जिल्ह्याचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या नजीक असलेली केंद्रे दिसतील.
  • यानंतर तुम्हाला तुमचा Age Group आणि Dose सिलेक्ट करावा लागेल. उदाहरण घ्यायचं झाल्यास तुमचा पिन कोड १२३४५६ आणि वयोगट १८-४४ असा सिलेक्ट करा आणि डोस सिलेक्ट करा.
  • Check Availability या टॅबवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक सिलेक्ट करा जो तुम्ही Co-Win अॅपसाठी वापरू इच्छित आहात.
  • तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल. तो ओटीपी टाकून त्या ठिकाणी असलेल्या डन या ऑप्शनवर क्लिक करा.
  • जर स्लॉट उपलब्ध असेल त्या प्रमाणे तुम्हाला स्लॉट आणि वेळ निवडता येईल.
  • टाईम स्लॉटमध्ये ज्या व्यक्तीला लस घ्यायची असेल त्याचं नाव सिलेक्ट केल्यानंतर Schedule Now वर क्लिक करा. यामुळे तुम्हाला लगेच माहिती मिळू शकणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

IMP