सर्व्हर डाऊनच्या मनस्तापानंतर दहा हजार नागरिकांचे लसीकरण 

औरंगाबाद : मनपाने शहरातील ४३ केंद्रावर आज शुक्रवारी लसीकरण करण्यात आले. प्रत्येक केंद्रावर पहिला आणि दुसरा डोस ठेवण्यात आल्यामुळे नागरिकांची गर्दी उसळली. कोविन पोर्टल डाऊन झाल्यानंतरही दोन तास नागरिक ताटकळले. मात्र त्यानंतरही नागरिकांचे लसीकरण झाले. दिवसभरात सुमारे दहा हजार नागरिकांना लस टोचण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली.

महापालिकेला बुधवारी रात्री २१ हजार लसी मिळाल्या होत्या. गुरूवारी दिवसभरात ६ हजार २४९ नागरिकांचे लसीकरण झाले. शुक्रवारी ४३ केंद्रावर लसीकरण ठेवण्यात आले. प्रत्येक केंद्रावर पहिला आणि दुसरा डोस नागरिकांसाठी ठेवण्यात आले. सकाळी दहा वाजता लसीकरणाला सुरूवात झाली.

दुपारी एक वाजता कोविन पोर्टल सर्व्हर डाऊन झाल्यामुळे लसीकरण बंद पडले. दोन तासांनी सव्र्हर पुन्हा सुरू झाल्यानंतर लसीकरण सुरू झाले. महापालिकेने दोन तासाचा वेळ वाढवून दिला. त्यामुळे सायंकाळी सहा वाजेपर्यंत नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. दिवसभरात सुमारे दहा हजार नागरिकांचे लसीकरण झाले असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या