पंतप्रधानांच्या आवाहनानंतर औरंगाबादेत १० टक्क्यांनी वाढले लसीकरण; आजपासून पेट्रोलपंपावरही मिळणार लस!

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर औरंगाबादेत १० टक्क्यांनी वाढले लसीकरण; आजपासून पेट्रोलपंपावरही मिळणार लस!

vaccination

औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधक लसीकरणाची गती वाढविण्याचे आदेश शासन वारंवार देत आहे. मात्र औरंगाबाद जिल्ह्याची लसीकरणाची टक्केवारी कमी असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra modi) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लसीकरणाची गती वाढविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाची गती वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यानुसार १० टक्क्यांनी लसीकरण वाढले असल्याचे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा(Dr.Paras mandlecha) यांनी सांगितले.

‘लस नाही तर प्रवास नाही, कार्यालयात प्रवेश नाही, असा निर्णय महापालिकेचे प्रशासक आस्तिकुकमार पांडेय(Astik kumar pandey) यांनी घेतला आहे. त्यासोबतच ‘हर घर दस्तक’ मोहीम राबवून घरोघरी जाऊन लस घेण्याचे आवाहन केले जात आहे. पेट्रोल पंपावर लस घेतली नसेल तर पेट्रोल मिळणार नाही, लस घेतली नसेल तर वेतन दिले जाणार नाही, दारूच्या दुकानांवर देखील लसीकरणाचे प्रमाणपत्र तपासले जाईल, असे निर्णय प्रशासनाने घेतले आहेत. त्यामुळे शहरातील लसीकरण केंद्रावर पुन्हा एकदा गर्दी दिसून येत आहे.

बुधवारी (दि. २४) तब्बल २० हजार १३७ एवढे लसीकरण झाले. गुरुवारी (दि. २५) देखील अनेक केंद्रावर लसीसाठी तोबा गर्दी झाल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. काही ठिकणी अतिरिक्त पथके पाठवावी लागली. यासंदर्भात डॉ. मंडलेचा यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra modi) यांनी आढावा घेतल्यानंतर सहा नोव्हेंबरपासून लसीकरणासाठी विविध उपाय-योजना सुरू करण्यात आल्या. शहरात १० टक्क्यांनी लसीकरण वाढले आहे. बुधवारची आकडेवारी ६८.३८ टक्के एवढी होती.

तीन पेट्रोल पंपावर आजपासून मिळणार लस

शहरात तीन पेट्रोलपंपावर शुक्रवारपासून (दि. २६) तीन पेट्रोल पंपावर लस मिळणार आहे. त्यात क्रांती चौक, दिल्लीगेट व उल्कानगरी येथील पेट्रोल पंपांचा समावेश असल्याचे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या