लसीकरणातही वशिलेबाजी, पहिल्या डोस नंतर ८४ दिवसांच्या आतच चार हजार नागरिकांनी घेतला दुसरा डोस

औरंगाबाद : केंद्र शासनाने कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर ८४ दिवसांचे केले आहे. पण शहरातील सुमारे चार हजार ३०० जणांनी त्यापूर्वीच गुपचूप लस घेतली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लसीकरणाच्या वेटींगच्या यादीत घोळ होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक लसीकरण करण्याची सूचना शासनाने केली होती. त्यानुसार महापालिकेने शहरात ११५ वॉर्डात व्यवस्था केली. पण लसीकरणासंदर्भात वारंवार नियम बदलले जात असल्याने गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाची गती मंदावली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाने ४५ वर्षावरील व्यक्तींसाठी कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवून ८४ दिवस एवढे केले आहे.

हे अंतर वाढल्यानंतर मात्र अनेकांनी शहरातील लसीकरण केंद्रावर वशिलेबाजी करून लस घेतल्याचे आता समोर आले आहे. किती जणांचे ८४ दिवस कधी संपतात, याची वेटींग लिस्ट महापालिकेतर्फे तयार केली जाते. त्यानुसार लसींचे नियोजन केले जाते. दोन दिवसांपूर्वी सुमारे सहा हजार जण ८४ दिवसांच्या वेटींगवर होते. पण प्रत्यक्षात त्यांनी आधीच लस घेतल्याचे समोर आले. वशिलेबाजी करून लस घेतलेली असल्यामुळे त्यांची नोंद पोर्टलवर झालेली नाही, असे सूत्रांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

 

IMP