लसीकरण केलेल्या नागरिकांना मुदत ठेवींवर मिळणार वाढीव व्याज

लसीकरण

मुंबई : संपूर्ण जगात कोरोना महामारीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक देश नुकतेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून सावरत आहे. अनेक ठिकाणी लसीकरण प्रक्रियेवर अधिक भर देण्यात आला आहे. मात्र अशातच काही देशात कोविड-प्रतिबंधक लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील काही बँकांनी एक अनोखा प्रयोग सुरु केला आहे. या योजनांमध्ये लसीकरण केलेल्या नागरिकांना मुदत ठेवींवर वाढीव व्याज दिले जाणार आहे. ही योजना ठरावीक कालावधीसाठी आणली गेली आहे.

लसीची एक डोस जरी घेतली असेल तर अशा ग्राहकांना युको बँकेने ९९९ दिवसांच्या मुदत ठेवींवर ३० आधार बिंदू अर्थात ०.३० टक्के अतिरिक्त व्याज लाभ देऊ केला आहे. ‘युकोव्ॉक्सी-९९९’ नावाची या योजनेत ग्राहकांना येत्या ३० सप्टेंबपर्यंत गुंतवणूक करता येऊ शकते.

मुंबईत मुख्यालय असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाने ‘इम्युन इंडिया ठेव योजना’ आणली आहे. लस घेतल्याचे प्रमाणपत्र असणारे ग्राहक या योजनेतील ठेवींवर ०.२५ टक्के अतिरिक्त व्याज मिळवू शकतील. ही मुदत ठेव योजना १,१११ दिवसांच्या कालावधीची आहे.

सध्या देशात अनेक नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे. त्यामुळे या लोकांना याचा फायदा मिळू शकतो. लसीकरणाचा पहिला डोस आणि दुसरा डोस घेतला असेल तर असे नागरिकाना ही चांगली संधी आहे. कोरोनाचा आर्थिक फटका अनेकांना बसला आहे. यातच बँकांकडून या योजना ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी देखील असण्याची शक्यता वर्तवता येऊ शकते.

महत्वाच्या बातम्या

IMP