दररोज किमान ५० हजार ते १ लाख लसीकरण करा, पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या सूचना

औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाली असला तरी कोरोना नाहीसा झालेला नाही. ‘ब्रेक दी चेन’ मोहीमे अंतर्गत नियमात शिथिलता आलेली असल्याने जनतेने अधिक सावधानता बाळगणे आवश्यक आहे. शासकीय यंत्रणांनी अधिक सज्ज राहून कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी अधिक सजगतेने काम करावे अशा सूचना उद्योग मंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी संबंधित सर्व शासकीय यंत्रणांच्या प्रमुखांना आज येथे दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री देसाई यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. लॉकडाऊनच्या संदर्भात निर्बंध शिथील झाले असले तरी नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे असून गर्दी होणार नाही याची काळजी घेत नागरिकांनी त्रिसूत्रीचे पालन करावे असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

लहान मुलांसाठी व्हेंटिलेटरची स्वतंत्र व्यवस्था करावी, तसेच लसीकरण मोहीम अधिक सक्रीय करत दररोज किमान ५० हजार ते १ लाख लसीकरण झाले पाहिजे, असे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठरवून त्या दिशेने नियोजन केल्यास भविष्यातील आरोग्य विभागावरचा ताण नक्कीच कमी होण्यास मदत होईल आणि म्हणूनच सर्व शासकीय यंत्रणांनी पूर्वी केल्याप्रमाणे आताही समन्वयाने काम करण्याच्या सूचना देसाई यांनी दिल्या.

महत्त्वाच्या बातम्या

IMP