fbpx

पर्यावरण संवर्धनाचा अनोखा ‘प्रयास’

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रयास युवा मंच व सामाजिक संशोधन संस्था, पुणे यांच्यातर्फे सामाजिक व पर्यावरण जागृती संबंधी पथनाट्य सादर करून प्रबोधन करण्याचं काम केले जात आहे. यंदाचे हे पालखी सोहळ्यामध्ये पथनाट्य करण्याचे  तिसरे वर्ष आहे. यावेळी सर्व स्वयंसेवकांनी वृक्ष लागवडीचे तसेच पर्यावरणाचे महत्व पटवून देताना बीजगोळे या पद्धतीने वृक्ष लागवडीचे फायदे समजावून सांगितले.
          या विद्यार्थ्यानी गेले १५ दिवस मेहनत घेऊन १०००० बिजगोळे तयार केले आहेत. हे बिजगोळे पुण्यात मुक्कामी असलेल्या वारकऱ्यांना वाटण्यात आले. जेणेकरून हे सर्व बिजगोळे पालखी मार्गावर रुजून वृक्ष बनतील.
याच पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम वारकऱ्यांनी अापापल्या गावात राबवण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. वारकऱ्यांनी प्रयासच्या सर्व स्वयंसेवकांचे कौतुक केले तसेच बीजगोळे तयार करण्याची पद्धत समजावून घेतली. सर्वांनी या उपक्रमात साथ देण्याची ग्वाही दिली आणि हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी माऊली चरणी प्रार्थना केली.
या उपक्रमात सुमारे ११० अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी आपला सहभाग दर्शविला.