तिने थेट केले योगी आदित्यनाथ यांच्याशी शुभमंगल सावधान !

टीम महाराष्ट्र देशा: साग्रसंगीत सप्तपदीसह सर्व विधीत पार पडलेला विवाह सोहळा. आणि लग्नात सहभागी झालेल्या पाहुण्यांना जंगी मेजवानी. हे चित्र कोणत्या लग्नातील नसून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे लक्ष वेधण्यासाठी महिलेने त्यांच्या फोटोसोबत केलेल्या विवाहाचा आहे. ही महिला अंगणवाडी कर्मचारी संघाच्या जिल्हाध्यक्ष नीतू सिंह आहेत.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण योगी आदित्यनाथ यांना १२० दिवसांची मुदत दिली होती. मात्र नऊ महिने झाले तरी काहीच झाले नसल्याने आपण त्यांच्या फोटोसोबत विवाह केल्याच नीतू सिंह यांनी सांगितले आहे. किमान लग्नानंतर तरी योगींना महिलांची किंमत कळेल असही त्या म्हणाल्या. तर अजूनही आपल्या मागण्या मान्य न केल्यास नववधूच्या वेशात घोड्यावर बसून त्यांच्याबरोबर जाणार असल्याचे नीतू सिंह यांनी सांगितले.