लाखो रुपयांची नोकरी धुडकावत भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी सैन्यात

टीम महाराष्ट्र देशा- सध्या विदेशात नोकरीला असणे हे प्रतिष्ठेच प्रतिक समजलं जातं. अगदी शिक्षणापासूनच पालक आपल्या मुलांना परदेशी पाठ्वात . लाखो रुपयांचा घसघशीत पगार मिळत असल्याने विद्यार्थी परदेशात मोठ्या पगारांच्या नोकऱ्या करणं पसंत करतात. मात्र भाजपच्या एका खासदाराच्या मुलीने वेगळा पायंडा रचला आहे. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार रमेश पोखरियाल निशंक यांची मुलगी श्रेयशी निशंकने विदेशातील लाखो रुपयांच्या नोकरीला अक्षरशः लाथ मारत सैन्यात सहभागी होऊन एक वेगळा आदर्श जगासमोर ठेवला आहे.

shreyashi nishank

राष्ट्रसेवा करण्याच्या इराद्याने श्रेयशी निशंकने परदेशातील लाखो रुपयांच्या नोकरी बाजूला सारून भारतीय सैन्यात सहभागी होऊन चा निर्णय घेतला असून डॉक्टर श्रेयशी निशंक शनिवारी अधिकृतरित्या कॅप्टन आर्मी मेडिकल कोरमध्ये रुजू झाली आहे.

सैन्याच्या हॉस्पिटलमधील कार्यक्रमात वडिल रमेश पोखरियाल यांनी मुलगी श्रेयशीला स्टार लावून कॅप्टनच्या रुपात सन्मान केला. रमेश पोखरियाल हे हरिद्वारचे खासदार असून त्यांनी मुलीचा सन्मान करतानाचा हा फोटो आपल्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवर शेअर केली. सोबतच लिहिलं की, मी खूप आनंदी आहे की माझी मुलगी डॉ श्रेयशी निशंकने उत्तराखण्डच्या सैन्याची परपंरा सुरू ठेवत. ऑर्मीमध्ये डॉक्टर पदावर रुजू झाली आहे. श्रेयशी आता रुडकीयेथील सैन्याच्या हॉस्पिटलमध्ये सेवा देणार आहे.

You might also like
Comments
Loading...