उत्तर प्रदेश विधानसभेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

वेबटीम : यूपी विधानसभा मध्ये चेकिंगच्या दरम्यान PETN नावाचे मोठे विस्फोट आढळून आल्याने सगळी कडे भीतीचे वातावरण पसरले आहे. प्राप्त माहिती नुसार प्लास्टिक विस्फोट PETN अशा नावाने ओळखला जातो.  जगातील जास्त तिव्रता असणाऱ्या स्फोटकांमध्ये याचा समावेश आहे.  Pentax era thriol tetranitrate असे याचे पूर्ण नाव आहे.  12 जुलैच्या संध्याकाळी विधानसभेच्या परिसरामध्ये जास्त तीव्रतेचे विस्फोट आढळून आले.  विधानसभेच्या परिसरामधे अशा प्रकारची घातक विस्फोट पावडर सापडणे हा चौकशीचा विषय आहे परंतु हा विस्फोटक किती घातक आहे हे आम्ही आपल्या पर्यंत पोहोचवतो आहोत.
दिल्ली हायकोर्टामध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये याचा वापर करण्यात आला होता. PETN विस्फोटकाचा वापर 7  सप्टेंबर 2011 दिल्ली उच्च न्यायालयाच्या बाहेर झालेल्या धमक्यात केला गेलेला होता. या हल्ल्यामध्ये 11 लोकांची जीवहाणी झाली आणि कमीतकमी 50 लोक जखमी झाले होते.
किती खतरनाक आहे हा PETN
– याला प्लास्टिक विस्फोटक या नावाने ओळखले जाते.
– उष्णतेमुळे सुद्धा याचा विस्फोट होऊ शकतो.
– फक्त 100 ग्रॅम विस्फोटकाने कार सुद्धा उडू शकते.
– जगातील पाच शक्तिशाली विस्फोटकांमध्ये याचा अंतर्भाव होतो.
– ही पावडर अती तीव्रता असलेल्या एक्सप्लोसिव मध्ये येते.
– स्निफर जातीचे कुत्रे सुद्धा याला शोधू शकत नाही.
– मेटर डिटेक्टर मध्ये सुद्धा हे सापडत नाही.
– साखरे सारखा शुभ्र असा हा विस्फोटक आहे.
– मोठ्या मोठ्या आतंवादी संघटना याचा वापर करतात.
PETN हे विस्फोटक अतीशय धोकादायक आहे असे मानले जाते.  समीक्षकांच्या माहितीनुसार सुरक्षा एजन्सी सुद्धा याच्याशी निपटू शकत नाही.  समीक्षक सांगतात की मोठया मोठ्या आतंवादी संघटना याचा वापर अती तीव्रतेच्या हल्ल्या करता करतात.  नुकतीच यूपी मध्ये आतंकवादी हल्ल्याची संभावना व्यक्त केली जात आहे.  विधानसभा परिसरात अशी विस्फोटक आढळून आल्याने सगळी कडे एकच खळबळ माजली आहे.