योगींची चर्चा तर होणारच; हे आहेत योगींचे वादग्रस्त तेवढेच लोकप्रिय निर्णय

yogi adityanath feacture

आपल्या वादग्रस्त तसेच धडाकेबाज निर्णयांसाठी नेहमी चर्चेत असणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिंदू सणांच्या संदर्भात नवी भूमिका मांडली आहे. जर ईदच्या काळात मी रस्त्यावर नमाज पठण करणाऱ्यांना रोखू शकत नसेन, तर राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये जन्माष्टमीचा उत्सव साजरा करू नका, असे सांगण्याचा कोणताही हक्क मला नाही, असे त्यांनी म्हटले आहे .एक प्रकारे पोलीस ठाण्यांमध्ये जन्माष्टमीचा उत्सव साजरा करणाऱ्या मंडळीना योगींच्या या निर्णयामुळे अभय मिळाल्याची चर्चा आहे . यापूर्वी देखील त्यांच्या सरकारचे अनेक वादग्रस्त निर्णय घेतले आहेत

yogi adityanath old photo

योगी सरकारचे वादग्रस्त निर्णय

अवैध कत्तलखान्यांवर बंदी
उत्तर प्रदेशमध्ये भाजपने निवडणुकीमध्येच अवैध कत्तलखान्यांचा मुद्दा लावून धरला होता. भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल त्यादिवशी रात्री 12 वाजल्यापासून अवैध कत्तलखान्यांवर कारवाई सुरु होईल, असं भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी स्पष्ट सांगितलं होतं.भाजपने प्रचारातील हा शब्द पाळत योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच अवैध कत्तलखान्यांवर कारवाईचा धडाका लावला. अनेक ठिकाणचे अवैध कत्तलखाने बंद करण्यात आले.या निर्णयानंतर गोरक्षकांनी मोठ्याप्रमाणावर उच्छाद मांडला होता .

अँटी रोमियो स्क्वाड
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी दिलेल्या आश्वासनानुसार योगी आदित्यनाथ यांनी राज्याच्या पोलीस दलाला अँटी रोमियो स्क्वाड तयार करण्याचे आदेश दिले होते . छेड काढण्याऱ्या रोडरोमियोंना रोखण्यासाठी तसेच छेड काढताना आढळल्या संबंधितांवर लगेच कारवाई करण्यासाठी अँटी रोमियो स्क्वाड काम करणार असल्याचे सांगण्यात आले होते मात्र सरकारच्या निर्णयामुळे मोठा वादंग निर्माण झाला होता

yogi with snake

यात्रेत अडथळा बनणारी ‘अशुभ’ झाडं कापण्याचे आदेश
कावड यात्रेच्या मार्गात येणारी झाडं कापण्याचे उत्तर प्रदेश सरकारने आदेश दिले. ही झाडं अशुभ असल्याचं सांगत ती कापून टाका, असं सांगितल्यानं सारेच बुचकळ्यात पडले. मुख्यमंत्र्यांनी सोडलेलं हे नवं फर्मान अंधश्रद्धेनं बरबटलं असल्याची जोरदार टीका आता होऊ लागली . विरोधीपक्षांनी देखील योगी आदित्यानाथ यांच्यावर निशाणा साधला आहे.

स्वातंत्र्यदिनी ८ हजार मदरशांमध्ये ‘देशभक्तीची चाचणी’

१५ ऑगस्ट रोजी राष्ट्रध्वज फडकवणं आणि राष्ट्रगीत म्हणणं हेदेखील अनिवार्य करण्यात आलं होत. विशेष म्हणजे या सगळ्या कार्यक्रमाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचीही सक्ती करण्यात आली होती. स्वातंत्र्यदिनी अर्थात १५ ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशातील एक किंवा दोन नाही तब्बल ८ हजार मदरशांमध्ये देशभक्तीची चाचणी घेण्यात आली.

yogi in goshala

योगी सरकारचे लोकप्रिय निर्णय
शेतकऱ्यांना कर्जमाफी

यूपीच्या निवडणुकीत भाजपनं सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन योगी आदित्यनाथांनी आता पूर्ण केल . यूपीतल्या प्रत्येक शेतकऱ्याला एक लाखाची कर्जमाफी देण्यात आली. दोन कोटी पंधरा लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार असल्याच जाहीर करण्यात  आलं . योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत हा धडाकेबाज निर्णय घेतला.

गरीब मुलींना लग्नासाठी 35 हजार रुपये आणि मोबाईल

गरीब मुलींच्या लग्नासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सामूहिक विवाह सोहळ्याचा निर्णय घेतला आहे.सामूहिक विवाह सोहळ्याअंतर्गत योगी सरकार एका मुलीसाठी 35 हजार रुपये खर्च करणार आहे. यापैकी 20 हजार रुपये थेट मुलीच्या खात्यात जमा होतील. याशिवाय उर्वरित 10 हजार रुपये कपडे, भांडी आणि दागिने खरेदी करण्यासाठी वापरले जातील. तर 5 हजार रुपये लग्न मंडपासारख्या खर्चासाठी देण्यात येतील.

तीहेरी तलाक पीडित महिलांसाठी आश्रम

योगी सरकारनं घेतलेल्या या नव्या निर्णयानुसार, यूपी सरकार विधवा महिलांप्रमाणेच तीन तलाख पीडित महिलांसाठी आश्रम उभारणार आहे. या आश्रमात पीडित मुस्लीम महिलांसाठी राहण्याची, जेवण्याची आणि त्याच्या सोबत असलेल्या मुलांच्या शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. सोबतच शिवणक्लास, कॉम्प्युटर आणि स्वयं रोजगार सारख्या सुविधाही या आश्रमात देण्यात येतील. यामुळे महिलांना पुन्हा स्वतःच्या पायावर खंबीर उभं राहता येणार आहे.

yogi with tiger

उत्तर प्रदेशात लग्नाचं रजिस्ट्रेशन अनिवार्य

काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने लग्नाचे रजिस्ट्रेशन बंधनकारक करण्याची सूचना राज्य सरकारांना केली होती. त्यानुसार योगी सरकारने रजिस्ट्रेशन सक्तीचं करण्याची सूचना महिला कल्याण विभागाला केलीय. आता मात्र यातून कुठल्याच समुदायाला सूट दिली जाणार नाही.ज्यांची लग्न हा कायदा येण्याच्या आधी झाली त्यांना मात्र सूट दिली जाईल. रजिस्ट्रेशन न करणाऱ्यांना मात्र दंड भरावा लागेल.

नवविवाहित जोडप्यांना कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या
नवविवाहित जोडप्यांना लग्नाचा आहेर म्हणून ‘शगुना’चं किट देण्याचा निर्णय घेतला . या किटमध्ये कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्या यांचा समवेश आहे . कुटुंब नियोजनासाठी ‘योगी’ सरकार हा उपक्रम राबवत आहे.