सरकारी अधिकाऱ्याचा महाप्रताप ; जाब विचारणाऱ्या युवकाला कारच्या बोनेटवरून फिरवल गावभर

blank

टीम महाराष्ट्र देशा : उत्तरप्रदेश मध्ये सध्या शासन आणि प्रशासन जनतेच्या मुळावर उठले आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. शौचालयाच्या बांधकामाची उरलेली रक्कम मागायला गेलेल्या व्यक्तीला गाडीच्या बोनेटवर लटकवून ४ किलोमीटर फिरवल्याची घटना बुधवारी उत्तरप्रदेशातील बरेली जिल्ह्यात घडली. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओतील या व्यक्तीचे नाव ब्रजपाल असून, तो रामनगर गट विकास अधिकारी यांच्याकडे शौचालयाच्या बांधकामाची उरलेली रक्कम मागायला गेला होता. त्यावेळी अधिकाऱ्यानी त्याला गाडीच्या बोनेटवर लटकवून ४ किलोमीटरपर्यंत फरवले.

बरेली जिल्ह्यातील गावकरी बुधवारी शौचालयाच्या बांधकामाची उरलेली रक्कम मागण्यसाठी रामनगर गट विकास अधिकारी पंकज कुमार गौतम यांच्याकडे गेले होते. त्यावेळी अधिकारी गाडीत बसले होते. गावकऱ्यांनी गाडी थांबवायला सांगितली मात्र, गट विकास अधिकारी गाडी थांबवायला तयार नव्हते त्यामुळे ब्रजपालने गाडीच्या बोनेटवर झोपत गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. तरीही अधिकाऱ्याने गाडी न थांबवता त्याला ४ किलोमीटर लांब फिरवले.

पहा या सरकारी अधिकाऱ्याचा महाप्रताप

https://www.youtube.com/watch?v=eiLiCGc8yLM