लखीमपुर घटनेबाबत उत्तर प्रदेश तसेच केंद्र सरकार आपले मौन सोडण्यास तयार नाही – पवार

लखीमपुर घटनेबाबत उत्तर प्रदेश तसेच केंद्र सरकार आपले मौन सोडण्यास तयार नाही - पवार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. पवार यांनी विविध मुद्यावर आपले मत व्यक्त केले. लखीमपुरमध्ये शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या हल्यात अजूनही उत्तर प्रदेश तसेच केंद्र सरकार आपले मौन सोडण्यास तयार नाही आहे असे पवार म्हणाले. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा. त्यासोबतच केंद्र सरकारतर्फे केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आजही मुख्यमंत्री वाटतंय यांच्या वक्तव्याला मी चार वेळा मुख्यमंत्री होतो पण ते लक्षात राहत नाही त्यांना मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं मी त्यांचं अभिनंदन करतो असं म्हणत पवारांनी फडणवीसांना टोला लगावला.पुढे त्यांनी अनिल देशमुखांचा विषय काढून त्यांच्यावर आरोप करणारे पोलीस अधिकारी कुठे आहेत असे विचारले.

काल जे जवान दहशतवादी हल्यात शहीद झाले अश्याप्रकारे मागच्या काही दिवसात असे हल्ले वाढलेले आहेत. तसेच त्यांनी मावळच्या घटनेमध्ये सरकार जवाबदार नव्हतं हे सांगितले आणि साखर कारखाने हे १५ दिवसात सुरु होतील याबाबत त्यांनी माहिती दिली.

महत्वाच्या बातम्या