जळगाव: माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात बोदवड नगरपंचायत आहे, खडसे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) सामील झाल्यानंतर प्रथमच त्यांच्या मतदार संघात या नगरपंचायतीची निवडणूक (Election) झाली.
या निवडणुकीत एकनाथ खडसे यांना चांगलाच धक्का बसला आहे. शिवसेनाचे आमदार चंद्रकांत पाटील (Shivsena MLA Chandrakant Patil) यांनी हा राजकीय धक्का दिला आहे. खडसे यांना धक्का देत बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेने आपला झेंडा फडकावला आहे. त्यामुळे आता बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व निर्माण झाले आहे. या नंतर एकनाथ खडसे यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, या ठिकाणी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची छुपी युती होती. त्यामुळे फक्त राष्ट्रवादीचा पराभव करण्याच्या हेतूने सर्व राजकीय पक्ष एकत्र आल्याचे चित्र दिसत होते. परंतु तरीही बऱ्यापैकी यश आम्हाला मिळाले. दुर्दैवाने ईश्वर चिठ्ठीमुळे आम्ही मागे पडलो अन्यथा आम्ही बहुमतापर्यंत पोहोचलो असतो. तरीही हा पराभव का झाला याची कारणमिमांसा करण्याची गरज आहे. त्याचे चिंतन आम्ही निश्चितच करू, असे खडसे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
बॉलीवूड महानायक अमिताभ यांच्या स्टाईलवर सौरव गांगुली फिदा! म्हणाला, “बॉस इज… ”
‘सत्तेबाहेर असलो तरी आम्हीच…’; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला टोला
रोहित पाटलांनी विरोधकांना पाजलं पाणी! चित्रा वाघ ट्वीट करत म्हणाल्या, “आज आबा असते तर…”