उस्मानाबाद लोकसभेला शिवसेनेकडून शंकर (तात्या) बोरकर?

टीम महाराष्ट्र देशा : देशात २०१९ लोकसभेचे पडघम वाजु लागले आहेत. प्रत्येक पक्षाच्या इच्छुक नेत्यांनी आपल्याला लोकसभेचे तिकीट मिळावे म्हणून तयरी सुरु केली आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदार संघामधून शिवसेनेचे शंकर (तात्या) बोरकर हे इच्छुक आहेत. बोरकर यांनी तशी जोरदार तयारी चालवली असल्याची माहिती मिळते आहे.

उस्मानाबाद लोकसभा मतदार संघामध्ये इच्छुक उमेदवारांची मोर्चे बांधणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यामध्ये मराठवाड्यातील उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ हा खुला असल्यामुळे तिथे इच्छुकांची गर्दी मोठी आहे. परंतु निवडणुक हि जिंकण्यासाठी असावी उभं राहण्यासाठी नसावी असा प्रत्येक पक्षाचा साधारणतः नियम असतो. त्यामुळे प्रत्येक पक्ष तसा तगडा उमेदवार शोधताना दिसत आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्याचा इतिहास पाहता राष्ट्रवादी हा पक्ष नात्या गोत्यांच्या पलीकडे गेलेला नाही.उस्मानाबादच्या राजकारणाला रक्त रंजीत इतिहास आहे. या मतदारसंघातुन राष्ट्रवादी कडून अर्चना पाटील यांचेच नाव पुढे आहे.
शिवसेनेकडून ताकतवान, स्वच्छ प्रतिमा, स्वच्छ चेहरा म्हणुन शंकर (तात्या) बोरकर यांचे नाव प्रभावीपणे आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेकडून कोणाला तिकीट मिळणार हा अजूनही अनुउत्तरीत प्रश्न असला तरी सर्व पातळीवर ताकतवान उमेद्वार म्हणुन शंकर (तात्या) बोरकर यांची दावेदारी मोठी मानली जात आहे. २०१४ ची मोदी लाट बर्यापैकी ओसरली असल्याचे चित्र सध्यातरी आहे. ४ राज्यांच्या निवडणुकीमुळे स्पष्ट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे युती होवो किंवा न होवो उमेद्वार सर्वंकष हा निकष म्हटलं तर उद्योगपती शंकर तात्या बोरकरच योग्य अशी चर्चा आता उस्मानाबाद जिल्ह्यात सुरु आहे.

या कारणामुळे लोकसभेचे तिकीट मिळू शकते

-शंकरराव बोरकर हे मातोश्री वरिल विश्वासू नेत्यातील एक आहेत तसेच त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्यासाठी 2004साली लोकसभा लढवून निवडणूकित चुरस निर्माण केली होती.
-शंकरराव बोरकर यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषद मध्ये विरोधी पक्षनेते पद यशस्वीपणे पेलले आहे .
-शंकरराव बोरकर यांनी तरूणांना रोजगार निमिर्तीसाठी मोठे प्रयत्न केले आहेत.
-देशातील तसेच विदेशी उद्योजक यांच्या सोबत त्यांची चांगल्या प्रकारे संबंध असल्याने मतदारसंघात तरूणांना रोजगार तसेच जिल्हाच्या विकास करण्यासाठी मोठ्या प्रकल्पांची निमिर्ती होऊ शकते.
-शंकरराव बोरकर यांचे कार्य उद्योग, सामाजिक, शैक्षणिक, तसेच सहकार श्रेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
-शंकरराव बोरकर यांनी आपल्या मातीची जाणीव तसेच आपल्या जिल्हातील लोकांना सोबत घेऊन चांगल्या प्रकारे काम करतात तसेच सामान्य लोकांना संकटात मदत केली आहे.

या कारणामुळे लोकसभेचे तिकीट नाकारले जाऊ शकते

-विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड हे पुन्हा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे तिकिटासाठी त्याची दावेदारी आहे.
– शंकरराव बोरकर हे मतदार संघात राहत नाहीत. ते कायम मुंबई येथे असतात.
-मतदार संघात म्हणावा तेवढा त्यांचा संपर्क नाही. गेल्या अनेक दिवसांपासून ते मतदार संघात फिरलेले नाहीत.
– नृसिंह सहकारी कारखाना सुरु केला. मात्र तो जास्त काळ चालू शकला नाही.