उस्मानाबाद लोकसभेला काँग्रेसकडून शिवराज पाटील चाकूरकर?

उस्मानाबाद : लोकसभेला कॉंग्रेस पक्षाकडून शिवराज पाटील चाकूरकर यांनी तयारी चालू केल्याने राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता पाहवयास मिळत आहे. चाकूरकर यांनी स्वतः पत्रकार परिषदेत उल्लेख केला की काँग्रेस पक्षाने संधी दिली तर आपण लोकसभा लढवणार आहोत. त्यामुळे उस्मनाबाद लोकसभा मतदार संघावर कॉंग्रेसने सुद्धा दावा केला आहे. शिवराज पाटील चाकूरकर यांनी कॉंग्रेस मधून जोर लावल्याची माहित मिळत आहे.
या लोकसभा मतदार संघामध्ये काँग्रेस पक्षाची मागील एक वर्षातील पक्ष बांधणी, संघटन आणि दिशा पहिली तर पाटील यांच्या सूचक वक्तव्याला पूरक अशीच आहे. त्यामुळे पाटील हे गेल्या एक वर्षापासून लोकसभेची तयारी करत आहेत हे यावरून स्पष्ट होत आहे. हि जागा राष्ट्रवादीकडे असली तरी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांच्यात आघाडी झाली तर, कॉंग्रेस या जागेवर शिवराज पाटील चाकूरकर यांच्यामुळे दावा सांगण्याची शक्यात आहे.
उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचा विचार केला तर या मतदार संघात काँग्रेसचे दोन आमदार आहेत. तर अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेत कॉंग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे या ठिकाणी कॉंग्रेसने सुद्धा जोरदार तयारी चालू केल्याचे कळते आहे. मात्र काही ठिकाणी काँग्रेसला आलेली मरगळ पाहता काँग्रेसला आत्मचिंतनाची गरज असल्याचं बोललं जातंय. शिवराज पाटील चाकूरकर सोडता इतर कोणी नेता लोकसभेसाठी इच्छूक असलेला अद्यापतरी दिसत नाही.
उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात एकूण सहा विधानसभा मतदार संघ येतात. त्यामध्ये औसा, उमरगा, उस्मानाबाद,भूम-परंडा-वाशी, तुळजापूर , बार्शी मतदार संघ आहेत. यामध्ये कॉंग्रेसचे दोन, राष्ट्रवादीचे तीन, शिवसेनेचा एक आमदार असे बलाबल आहे.Loading…


Loading…

Loading...