Share

Car Cleaning Tips | ‘या’ सफाई पद्धती वापरून नव्यासारखी चमकेल तुमची कार

Car Cleaning Tips टीम महाराष्ट्र देशा : प्रत्येक कार Car मालकाला असे वाटत असते की आपली कार ही नेहमी  नव्यासारखी दिसावी. त्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून आपली कार स्वच्छ आणि चमकदार ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. कारण रस्त्यावर जात असताना आपली गाडी नेहमी वेगळी आणि उठून दिसली पाहिजे, असे प्रत्येक कार मालकाला वाटतं असते. म्हणूनच आज आम्ही या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला कार साफ करण्याच्या काही सोप्या पद्धती सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही तुमची कार अगदी नव्यासारखी ठेवू शकाल.

कार साफ करण्याच्या सोप्या पद्धती

शाम्पूने कार धुवा

अनेक वेळा लोक गाडी डिटर्जंट पावडरने धुताना दिसतात. पण त्यामुळे गाडी खराब होण्याची शक्यता असते. आणि त्याचबरोबर गाडीच्या पृष्ठभागावर कोरडेपणा देखील येतो. त्यामुळे गाडी धुताना नेहमी शाम्पूचा वापर करा.

कारच्या टायरला ब्रशने साफ करा

गाडीची सफाई करताना गाडीचे टायर साफ करणे सर्वात अवघड जाते. त्यामुळे कारचे टायर साफ करण्यासाठी मोठ्या लाँड्री ब्रशचा वापर करावा. त्यामुळे टायरच्या चरांमध्ये भरलेले माती अगदी सहजपणे काढली जाते. आणि त्यामुळे कारचे टायर नव्या सारखे दिसायला लागतील.

कारच्या आतील बाजूची सफाई

कारच्या केबिनच्या भागात खूप धूळ साचते. त्यामुळे गाडीचा आतील भाग खूप घाणेरडा दिसायला लागतो. गाडीचा आतील भाग स्वच्छ करण्यासाठी तुम्ही पाण्यामध्ये शाम्पू मिसळून मऊ कापडाने तो साफ करू शकता. त्यामुळे गाडीच्या आतील भागात कोणतीही नुकसान होणार नाही आणि गाडी पूर्णपणे स्वच्छ देखील होईल.

कार्पेटची साफसफाई

संपूर्ण गाडी साफ झाल्यावर उरतो तो कारच्या तळाशी असलेला कार्पेट ज्याला सर्वाधिक घाणीचा सामना करावा लागतो. कारण आपल्या पायातली धूळ आणि घाण त्यावर साचते आणि त्यामुळे ते सर्वाधिक घाण होते. कारच्या कार्पेटची साफसफाई करण्यासाठी कार्पेट काढून ते व्हॅक्युम क्लिनर किंवा एअर कॉम्प्रेसरच्या मदतीने स्वच्छ करावे. कार्पेट बाहेर काढून स्वच्छ केल्याने त्यातली धूळ आणि माती पूर्णपणे स्वच्छ होईल. आणि कार्पेट नावासारखे चमकू लागेल.

‘या’ टिप्स वापरून कारला बनवा चमकदार 

कार चमकवण्यासाठी तुम्ही कंडिशनर, पॉलिशिंग किंवा कोटिंग वापरू शकतात. या गोष्टींचा उपयोग केल्यामुळे तुमच्या गाडीला नुकसान देखील होणार नाही. गाडीवर सर्वाधिक चमक आणण्यासाठी कंडिशनर हा एक सर्वोत्तम पर्याय आहे.

महत्वाच्या बातम्या 

Car Cleaning Tips टीम महाराष्ट्र देशा : प्रत्येक कार Car मालकाला असे वाटत असते की आपली कार ही नेहमी  नव्यासारखी …

पुढे वाचा

Cars And Bike

Join WhatsApp

Join Now