शिवसेनेन सत्तेचा वापर करुन राष्ट्रवादीच्या दोन आमदारांना गोवल – दिलीप वळसे

अहमदनगर : अहमदनगर येथील शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रवादीच्या दोन आमदारांना शिवसेनेने सत्तेचा वापर करून गोवल असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते व विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसेपाटील यांनी केली आहे. अहमदनगर येथील राष्ट्रवादी भवनमध्ये वळसेपाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ तेव्हा त्यांनी ही टीका केली आहे.

ज्या आरोपीने हे कृत्य केले आहे, त्याचा राष्ट्रवादीशी काहीही संबंध नाही़ तो पक्षाचा सदस्य नाही. या घटनेच्या चौकशीसाठी आमदार संग्राम जगताप यांना पोलीस ठाण्यात बोलावले असता तेथे तरुणांची मोठी गर्दी झाली होती. तेथे ज्या तरुणाने पोलीस ठाण्याची काच फोडली त्याचा पोलिसांनी शोध घेतला पाहिजे. पण तसे न करता राष्ट्रवादीच्या नेत्यांवर व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत असे दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत.

तसेच, केडगाव हत्याकांडाशीही राष्ट्रवादीचा काहीही संबंध नसताना या प्रकरणात राष्ट्रवादीच्या दोन आमदारांना गोवण्याचा प्रयत्न केला आहे. यात राजकीय षढयंत्र आहे. विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. आमदार संग्राम जगताप यांच्या लोकप्रियतेची धास्ती त्यांनी घेतली आहेत. त्यामुळे त्यांनी हे आरोप लावले आहेत़ राष्ट्रवादीच्या आमदारांना असे खोट्या गुन्ह्यात अडकविले जात आहे, हे खपवून घेतले जाणार नाही. शिवसेनेने आरोप सिद्धध करावेत अन्यथा कारवाईला तयार रहावे. अस सुद्धा दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केल आहे.

You might also like
Comments
Loading...