पेटीयम वापरताय ! थांबा, आधी हे वाचा

टीम महाराष्ट्र देशा : पेटीयम (Paytm) वापरकर्त्यांनी केवायसी (KYC) अपडेट करताना काळजी घ्यावी,असा इशारा पेटीएम कंपनीकडून देण्यात आला आहे.केवायसी अपडेटसाठी अॅनिडेस्क किंवा क्विकसपोर्ट अॅप डाउनलोड करा, अशा एसएमएस किंवा कॉलद्वारे पेटीएम अकाउन्टची सर्व माहिती हॅक केली जात आहे, असे ट्विट सायबर पोलिसांनी केले आहे.

Loading...

नागरिकांच्या मोबाईलवर नोटिफिकेशन एसएमएसद्वारे काही बँक मेसेज येतात. त्यामध्ये तुमच्या खात्यावरून काही ठराविक रक्कम वजा झाली आहे, अधिक माहितीसाठी या नंबरवरती संपर्क साधा किंवा दिलेली लिंक शेअर करा, असा मजकूर असतो. नागरिकांनी अशा प्रकारच्या मेसेजला पुन्हा उत्तर देऊ नये किंवा लिंक शेअर करू नये, अशी माहिती सायबरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी दिली.

अॅनिडेस्क किंवा क्विकसपोर्ट अॅप डाउनलोड केल्यास अथवा लिंक ओपन केल्यास आपल्या मोबाईलचा अॅक्सेस सायबर चोरट्याकडे जातो. आपल्या फोनमध्ये येणारे ओटीपी, मेसेज, बँकेचे ऑनलाईन अॅप ,पेटीयम, गुगल पे सारख्या अॅपचा अॅक्सेस त्यांच्याकडे जातो. त्यामुळे सहजासहजी चोरटे आपल्या अकाउन्टमधील रक्कम काढून घेतात. तसेच त्यांच्या वरती तत्काळ कारवाई केली जाऊ शकते, म्हणून आपल्याला पाठवण्यात आलेला मेसेजही ते डिलीट करून टाकतात.

अशा प्रकारे नकळत लोकांची फसवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे, अशी माहिती सायबर पोलिसांनी दिली आहे.नागरिकांनी अशा प्रकारच्या एसएमएस किंवा फोनपासून सावधान रहावे, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी केले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
शरद पवार होणार निवृत्त ? पुन्हा राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
एकनाथ खड्सेंचे निर्दोषत्व सिद्ध झाल्यास ; फडणवीस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता ?
'तृप्ती देसाईंवर अश्लील टीका इंदुरीकरांच्या सूचनेनुसारच' ; तासगावात तक्रार