टीम महाराष्ट्र देशा: दररोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या तब्येतीसोबतच आपल्या चेहरा आणि केसांकडे दुर्लक्ष करत असतो. धूळ प्रदूषण यामुळे आपला चेहरा आणि केसांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे चेहरा आणि केसांची निगा राखण्यासाठी आपण अनेक केमिकल युक्त प्रोडक्टचा वापर करत असतो. पण केमिकल प्रोडक्ट वापरल्यावर आपल्या चेहऱ्याला आणि केसांना हानी पोहचवू शकते. त्यामुळे हे प्रॉडक्ट्स वापरणे टाळून आपण त्यासाठी काही घरगुती उपाय करू शकतो. यामध्ये प्रामुख्याने कढीपत्ता आपल्या चेहरा Skin आणि केस Hair साठी उपयोगी ठरू शकतो.
अन्नाची चव वाढवण्यासाठी वापरला जाणारा कढीपत्ता हा सर्वांच्याच ओळखीचा आहे. कढीपत्त्याच्या वापरानंतर पदार्थ अधिक जास्त चविष्ट बनतो. पण कढीपत्त्याचा उपयोग चांगल्या भाजीसाठीच नाही तर चेहरा आणि केसांची चांगली निगा राखण्यासाठी देखील आपण करू शकतो. कढीपत्त्यामध्ये अँटी-एक्सीडेंट आणि अँटी-इम्प्लिमेंटरी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्याचबरोबर कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन बी आढळते. त्यामुळे कढीपत्ता आपला चेहरा आणि केस यांची निगा राखू शकतो.
केसांवर Hair कढीपत्त्याचा पुढीप्रमाणे उपयोग करा
केसांना कढीपत्ता लावण्यासाठी तुम्ही केस धुताना पाण्यात कढीपत्ता उकळून त्या पाण्याने केस देऊ शकतात. पाण्यात कढीपत्ता उकळून केस धुतल्याने केस गळणे कमी होतेच पण त्याबरोबर केस पांढरे होणे ही कमी होतात. या पाण्याने केस धुतल्याने तुमचे केस काळे होणार नाही पण तुमचे केस पांढरे होणे थांबतील.
केसांची निगा राखण्यासाठी तुम्ही कढीपत्ता तेलात टाकूनही केसांना लावू शकतात. यासाठी तुम्ही कोणतेही नैसर्गिक तेल घेऊन त्यामध्ये कढीपत्ता उकळून घेऊन आणि नंतर त्याला थोडे कोमट करून केसांवर त्याची मसाज करू शकतात. तेलामध्ये कढीपत्ता उकळून ते तेल डोक्याला लावणे हा केसांच्या प्रत्येक समस्येसाठी एक रामबाण उपाय आहे.
त्याचबरोबर तुम्ही केसांना कढीपत्त्याचा हेअर मास्क काही लावू शकतात. कढीपत्त्याचा हेअर मास्क लावण्यासाठी सर्वप्रथम कढीपत्त्याला बारीक करून घ्या. त्यानंतर बारीक झालेला कडीपत्ता मेहंदी मध्ये मिक्स करून आपल्या केसांना लावा. त्याचबरोबर तुम्ही कढीपत्ता बारीक करून दह्यामध्येही मिक्स करून केसांना लावू शकता. असे केल्याने तुमच्या केसातील कोंड्याची समस्या नाहीशी होऊन केसांमध्ये येणारी खाज देखील कमी होईल. परिणामी तुमचे केस मजबूत आणि निरोगी राहतील.
चेहऱ्यावर Skin या पद्धतीने कढीपत्ता लावा
तुम्हाला जर चेहऱ्यावरील ॲक्ने समस्या असेल तर कढीपत्ता हा तुमच्यासाठी सर्वोत्तम उपाय ठरू शकतो. यासाठी तुम्हाला पाण्यामध्ये कढीपत्ता उकळून घ्यावा लागेल. हे कढीपत्त्याच्या पाण्याचे मिश्रण गार झाल्यावर ते चेहऱ्यावर लावा. कढीपत्ता पाण्यात उकळून नियमित चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील ॲक्नेची समस्या दूर होईल. कढीपत्त्यामध्ये आढळणारे अँटीबॅक्टरियल गुणधर्म चेहऱ्यावरील ॲक्नेची समस्या दूर करतात.
कढीपत्ता किंवा कोणतेही नैसर्गिक घरगुती उपाय केल्यावर त्याचा झटपट परिणाम होत नाही. या गोष्टींचा रिझल्ट दिसायला थोडा वेळ लागतो त्यामुळे तुम्ही नियमितपणे या घरगुती उपायांचा वापर चालू ठेवला पाहिजे. नियमित या गोष्टी चालू ठेवल्याने तुम्हाला त्याचे फायदे लवकरात लवकर दिसायला लागतील.
टीप : वरील गोष्टींसाठी डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला घ्या.
महत्वाच्या बातम्या
- Anushka Sharma | कोलकत्याच्या काली घाट मंदिराजवळ मुलगी वामिका सोबत दिसली अनुष्का शर्मा
- Aditya Thackeray । “कृषीमंत्र्यांना ‘त्यांच्या’ सोबत बसायचं असतं”, आदित्य ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर निशाणा
- Gulabrao Patil | रवी राणा अन् बच्चू कडू यांच्या वादात गुलाबराव पाटलांची उडी, म्हणाले…
- Tea Tips | गुलाबी थंडीमध्ये निरोगी राहण्यासाठी ‘या’ चहा ने करा दिवसाची सुरुवात
- Bachhu Kadu | “असली मंत्रिपदं ओवाळून टाकतो, राजीनामा आमच्या हातात”; बच्चु कडू आक्रमक