fbpx

ब्रेकिंग : सुप्रिया सुळेंंच्या विरोधात भाजपकडून उषा काकडे यांना उमेदवारी ?

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी पहायला मिळत आहेत. बारामती लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

उषा काकडे या सामाजिक कार्यात गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. युएसके फाउंडेशन च्या माध्यमातून त्या समाजकार्यात सक्रीय आहेत. गेल्यावेळी महादेव जानकर यांनी सुळे यांना चांगलीच टक्कर दिली होती मात्र भाजपचे चिन्ह नसल्याने अगदी त्यांचा थोडक्यात पराभव झाला होता. यावेळी भाजपला या मतदार संघात अनुकूल वातावरण आहे. दौंड,पुरंदर,इंदापूर,खडकवासला या भागात भाजपला पोषक असे वातावरण आहे. त्यामुळे उषा काकडे या सुळेंंच्या विरोधात तगड्या उमेदवार होऊ शकतात.

दरम्यान,भाजपवर नाराज असलेले खा. संजय काकडे हे कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती मात्र जर पत्नीला इकडे उमेदवारी मिळाली तर हा प्रवेश देखील रोखला जाणार आहे.