टीम महाराष्ट्र देशा- चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या स्वाती उर्फ माई काटे आणि भाजपच्या उषा उर्फ माई ढोरे यांनी लढत होती. पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौरपदी सांगवीचे प्रतिनिधीत्व करणा-या भाजपच्या उषा उर्फ माई ढोरे यांची बहुमताने निवड झाली. त्यांना 81 मते पडली. तर, राष्ट्रवादीच्या स्वाती उर्फ माई काटे यांचा पराभव झाला. त्यांना 41 मते पडली.
दरम्यान, राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेच्या महाविकासआघाडीचे समीकरण जुळत असताना नाशकात महापौर, उपमहापौर निवडणुकीत महाविकासआघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना, भाजप नगरसेवक फोडणाऱ्या बाळासाहेब सानप यांनी ऐनवेळी तलवार म्यान करत माघार घेतल्याने नाशिकच्या महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी यांची तर भीखुबाई बागुल यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे.
अमरावतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महापालिकेच्या १६ व्या महापौर , उप महापौरपदाची आज हात उंचावून निवडणूक पार पडली. यामध्येही भाजपची सरशी दिसून आली. महापौरपदी चेतन गावंडे, तर उपमहापौरपदी कुसूम साहू यांची निवड झाली. त्यांना प्रत्येकी ४९ मते पडलीत.
या निवडणुकीत शिवसेनेचे सदस्य तटस्थ राहिलेत. महाशिवआघाडाचा प्रयत्न फसल्याने काँग्रेसचे महापौरपदाचे उमेदवार विलास इंगोले व प्रदीप हिवसे यांनी माघार घेतली. महापौरपदासाठी एमआयएमचे नगरसेवक हुसेन यांना २३ मते, बसपचे माला देवकर यांना ५ मते पडली.
राज्यातील प्रमुख महानगरपालिकांचे महापौर आज (22 नोव्हेंबर) निवडले जात आहेत. पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपचे मुरलीधर मोहोळ यांची महापौरपदी निवड झाली आहे.शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर मुंबईच्या महापौरपदी विराजमान झाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1197808213959118848?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1197807869594202113?s=20