‘Instagram’ वापरण्यासाठी आता युझर्सना मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

‘Instagram’ वापरण्यासाठी आता युझर्सना मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

instagram

नवी दिल्ली: सध्या इन्स्टाग्राम विनाशुल्क वापरता येत असलं तरी लवकरच त्यासाठी युजर्सना पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. सध्या टिक-टॉक नंतर इन्स्टाग्राम रील्स अधिक प्रचलित झाल्या आहेत. मात्र आता इन्स्टाग्राम वापरण्यासाठी युजर्सना 89 रुपये मोजावे लागणार आहेत.

इन्स्टाग्राम आता नव्या सब्सक्रिप्शन फीचरवर काम करत असून, त्यानुसार कंटेट अॅक्सेस करण्यासाठी युझर्सना दरमहा 89 रुपये द्यावे लागणार आहेत. याचा इन्स्टाग्राम क्रिएटर्स आणि एन्फ्लुएन्सर्सना फायदा होईल, असं कंपनीचं म्हणणं आहे. अद्याप कंपनीनं या पेड फीचरचं अधिकृत धोरण जाहीर केलेलं नाही. याबाबतचं वृत्त `दैनिक भास्कर`ने दिलं आहे.

दरम्यान सब्सक्रिप्शन घेतल्यानंतरच इन्स्टाग्राम युझर्स त्यांच्या आवडीच्या क्रिएटर्सचा कंटेट पाहू शकणार आहेत. जो इन्स्टाग्राम युजर 89 रुपये देऊन सब्सक्रिप्शन घेईल त्याला एक बॅच देण्यात येईल. त्यानंतर युझरने काही कमेंट किंवा मेसेज केला तर त्याच्या युजरनेमसमोर हा बॅच दिसणार आहे. या माध्यमातून युझरला `सब्सक्रिप्शन घेतलेला युझर्स` अशी ओळख मिळणार आहे. सब्सक्रिप्शननंतर क्रिएटर्सना मिळणारं उत्पन्न आणि मेंबरशिप संपण्याविषयीचा तपशील दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या