हाडे मजबूत होण्यासाठी उपयुक्त आहार

वेब टीम – आरोग्य राखण्यासाठी हाडांची मजबूतीही गरजेची आहे. हाडे कल्शियम आणि मिनरल्सपासून बनलेली आहेत. आपल्या शरीराची हालचाल हाडांशी निगडीत असल्याने ती बळकटे असणे आवश्यक आहे. म्हणून हाडे बळकट होण्यासाठी आहारात या ७ पदार्थांचा समावेश करा…

मासे
माशांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते. हाडांच्या बळकटीसाठी त्याची आवश्यकता असते. त्याचबरोबर माशांमधील ओमेगा ३ फॅटी अॅसिडमुळे हाडांची झीज होत नाही.

हिरव्या पालेभाज्या
पालेभाज्या या कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे पालक, मेथी, कोबी, ब्रोकोली यासांरख्या भाज्या अवश्य खा.

अंडे
अंड्यात प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात. त्याचबरोबर त्यातील व्हिटॉमिन डी हाडांच्या मजबूतीसाठी फायदेशीर ठरतात.

संत्र
संत्र्यातील व्हिटॉमिन सी हाडे बळकट करण्यासाठी उत्तम ठरतं.

बदाम
यात पोटॅशियम, ओमेगा ३ फॅटी अॅसिड, कॅल्शियम यांसारखे घटक असल्याने ते हाडे बळकट होण्यासाठी फायदेशीर ठरतात.

मनुके
ऑस्टियोपिरॉसिस असलेल्या महिलांसाठी मुठभर मनुके खाणे गरजेचे आहे. त्यात इनुलिन नावाचे फायबर असते जे शरीरासाठी कॅल्शियमचे शोषण करण्यास आणि हाडे मजबूत करण्यास मदत करते. अर्थरायटिसच्या समस्येवरही मनुके खाणे फायदेशीर ठरते.

You might also like
Comments
Loading...