तुमचे साम-दाम-दंड-भेद पेट्रोल,डिझेलचे दर कमी करण्यात वापरा: आदित्य ठाकरे

मुंबई: “पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात आणण्यासाठी साम-दाम-दंड-भेदचा वापर करा”, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकी भाजप-शिवसेना एकमेकांचे वाभाडे काढत आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप भर सभेत सादर केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

राजकीय वातावरण आता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही तेल ओतले आहे. इंधन दरवाढीवरुन आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.