Share

Makeup Tips | चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासाठी ‘या’ सोप्या पद्धतींचा करा वापर

टीम महाराष्ट्र देशा: सध्या सगळीकडे दिवाळीची धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे सगळीकडे दिवाळीची लगबग पाहता सजावटीचा जोर वाढला आहे. दरम्यान, सगळीकडे दिवाळी सेलिब्रेशनच्या पार्ट्या आयोजित केल्या जात आहे. त्यामुळे आजकाल महिला मेकअप Makeup चा जास्त वापर करतात. कारण पार्ट्यांमध्ये मेकअप केल्यावर आपण अधिक आकर्षित दिसतो. त्यामुळे दिवसेंदिवस स्त्रियांमध्ये मेकअपचे प्रमाण वाढत चालले आहेत. पण मेकअप आपल्या त्वचेसाठी हानिकारक असतो. त्यामुळे मेकअप केल्यावर तो  व्यवस्थित रित्या काढला गेला पाहिजे. नाहीतर त्याचे आपल्या चेहऱ्याला वाईट परिणाम भोगावे लागू शकतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून मेकअप काढण्याच्या सहज सोप्या पद्धती सांगणार आहोत. या पद्धतींचा वापर करून तुम्ही अगदी सहजतेने तुमचा मेकअप काढू शकतात.

सोप्या पद्धतीने मेकअप काढण्याच्या टिप्स

मेकअप काढण्यासाठी बेबी ऑइल किंवा क्लिजिंग ऑइल वापर करा

चेहऱ्यावर लावलेल्या जाड मेकअप लेयर काढण्यासाठी बेबी ऑइल किंवा क्लिजिंग ऑइल उपयोगी ठरू शकते. बेबी ऑइल आणि क्लिजिंग ऑइल चा उपयोग करून सहजपणे तुम्ही मेकअपचा थर काढू शकता. कारण हे ऑइल मेकअप काढतान त्वचेला हायड्रेट करतात ,त्यामुळे तुम्ही सहजपणे कापसाच्या मदतीने मेकअप काढू शकता. कापसावर दोन-तीन थेंब या तेलाचे टाका आणि हळुवारपणे त्याने चेहरा स्वच्छ करा.

क्लिजिंग बाम

बाजारामध्ये सहजरीत्या तुम्हाला उपलब्ध असलेले क्लिजिंग बाम मेकअप करण्यासाठी खूप मदत करू शकते. क्लिजिंग बाम चेहऱ्यावरील मेकअप काढून त्वचेला मॉइश्चराईज देखील करते. मेकअप काढण्यासाठी क्लिजिंग बाम हातावर घेऊन चेहऱ्यावर लावा आणि त्यानंतर गोलाकार पद्धतीने हलक्या हाताने चेहऱ्यावर मालिश करा. यामुळे चेहऱ्यावरील ड्रायनेस देखील दूर होईल.

कोल्ड क्रीम

जर तुमच्याकडे मेकअप काढण्यासाठी काहीच नसेल तर तुम्ही त्यासाठी कोल्ड क्रीम चा वापर करू शकता. गोल्ड क्रीम तुमच्या त्वचेला मॉइश्चराईच करते त्यामुळे मेकअप काढण्यासाठी देखील ती फायदेशीर ठरू शकते. कोल्ड क्रीमच्या साह्याने मेकअप काढण्यासाठी सर्वप्रथम कोल्ड क्रीम चेहऱ्यावर लावा आणि त्यानंतर टिशू पेपर किंवा कापसाच्या मदतीने ते स्वच्छ करा.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: सध्या सगळीकडे दिवाळीची धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे सगळीकडे दिवाळीची लगबग पाहता सजावटीचा जोर वाढला आहे. दरम्यान, सगळीकडे …

पुढे वाचा

Marathi News

Join WhatsApp

Join Now