टीम महाराष्ट्र देशा: ऋतू कोणताही असो डासांची (Mosquito) समस्या ही कायमच असते. डासांमुळे आपल्याला अनेक आजार होऊ शकतात. त्याचबरोबर त्यांच्या चावल्याने आपल्या हातापायाची आणि चेहऱ्याची स्थिती खराब होते. बाजारात उपलब्ध असलेल्या मार्टिन, ओडोमास यांच्याद्वारे आपण मच्छरांना दूर करतो. पण त्याचा काही फारसा परिणाम आपल्याला दिसत नाही. म्हणूनच आज या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला डासांना पळवून लावण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे घरगुती उपाय वापरून तुम्हाला डासांपासून आराम मिळू शकतो.
वाढत्या डासांना (Mosquito) दूर ठेवण्यासाठी ‘या’ घरगुती पद्धती वापरा
कापूर
डासांपासून बचाव करण्यासाठी कापूर हा एक रामबाण उपाय आहे. यासाठी तुम्हाला तुम्ही ज्या खोलीत झोपता त्या खोलीमध्ये दार बंद करून कापूर लावावे लागेल. यामुळे अर्धा तासात खोलीमध्ये नक्कीच डास सापडणार नाही. त्याचबरोबर तुम्ही संपूर्ण खोलीमध्ये कापुराचे पाणी शिंपडू शकता. कापुराच्या वासाने डास नाहीसे होतात.
पुदिना
कापुराच्या वासाप्रमाणेच पुदिनाच्या वासानेही डास पळून जातात. घरातील डास पळून लावण्यासाठी तुम्ही घरामध्ये पुदिन्याचे तेल शिंपडू शकतात. त्याचबरोबर घराच्या ज्या भागांमध्ये जास्त डास असतात त्या भागात तुम्ही पुदिन्याचे तेल देखील ठेवू शकतात. पुदिन्याच्या वासाने डास नाही होतात.
लिंबू आणि लवंग
तुमच्या घरात जर लिंबू किंवा लवंगाचा वास उपलब्ध असेल तर डास घरात येणार नाही. यासाठी तुम्ही लिंबाचा रस घरात शिंपडू शकतात. त्याचबरोबर तुम्ही घरात लवंगाचा धूर करू शकतात. लवंगच्या धुराने घरातील सगळे डास पळून जातील.
लसूण
घरातील डासांना पळवून लावण्यासाठी लसूण हा एक सर्वोत्तम उपाय आहे. यासाठी तुम्हाला लसूण पाण्यात उकळून घ्यावे लागेल. नंतर ते पाणी घरात शिंपडावे लागेल. यानंतर घरातील सगळे डान्स पळून जातील. कारण लसणामध्ये उपलब्ध असलेले सल्फर डासांना अजिबात आवडत नाही.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
- Skin Care Tips | ‘या’ पद्धती वापरून मानेवरील काळेपणा करा दूर
- Rohit Pawar | भाजपकडून देशातील आयडॉल बदलण्याचा प्रयत्न होतोय का? – रोहित पवार
- Sushma Andhare | भाजपमध्ये हिंमत असेल तर नारायण राणेंच्या घरात घुसून आंदोलन करावं – सुषमा अंधारे
- Weight Loss Tips | शरीरावरील चरबी कमी करायची असेल तर, करा ‘ही’ योगासनं
- Sushma Andhare | एकनाथरावांना रिक्षावाल्यांची दु:ख कळली पाहीजेत – सुषमा अंधारे