बुलेट ट्रेनच्या बांधकामासाठी होणार शुद्ध पाण्याचा वापर

bullet_train

मुंबई: बुलेट ट्रेनचे बांधकाम करण्याची शुद्ध पाणी वापरण्यात येणार आहे. अहमदाबाद मार्गावरील प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पावरून वादाची चर्चा होत असतांना या प्रकल्पाचे सर्व बांधकाम भक्कम होण्यासाठी शुद्ध पाण्याचा वापर केला जाणार आहे. कोणत्याही बांधकाम प्रकल्पात सिमेंट, वाळू आणि अन्य मिश्रणासाठी बोअरवेल पाण्याचा वापर प्रामुख्याने होतो. मात्र बुलेट ट्रेनचे बांधकाम करण्यासाठी ‘आर.ओ.’ पद्धतीने शुद्ध केलेल्या पाण्याचा वापर होणार आहे.

बोअरवेल किंवा टँकरमार्फत पुरवल्या जाणाऱ्या पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असते. मात्र, हे क्षार कालांतराने बांधकामे कमकुवत करण्यास कारणीभूत ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणूनच बुलेट ट्रेनचा वेग, विस्ताराचा आढावा घेताना सुरक्षेशी कोणतीही तडजोड न करण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. शुद्ध पाण्यामुळे लोखंडी सळ्या वा तत्सम कोणत्याही भागाला संभाव्य झळ पोहोचत नाही, असा दावा केला जात आहे. सध्या खासगी इमारतींच्या बांधकामांमध्ये शुद्ध पाण्याचा वापर करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. बुलेट ट्रेनचे बांधकामही त्याच धर्तीवर व्हावे यासाठी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनतर्फे शुद्ध पाण्याचा वापर करण्यावर भर दिला जात आहे.