‘देवस्थानांचा निधी असंघटित कष्टकरी कामगारांच्या उपजिविकेसाठी उपयोगात आणावा’

पुणे: कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्माण झालेली रोजगाराची गंभीर परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने देवस्थानांचा निधी असंघटित, गरीब आणि कष्टकरी मजूर बेरोजगारांसाठी उपजीविकेच्या सुविधांसाठी, आरोग्य विषयक उपाय योजनासाठी उपयोगात आणावा,अशी मागणी रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

लोकजनशक्ती पक्षाचे पुणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय अल्हाट, प्रदेश सरचिटणीस अशोक उर्फ अण्णासाहेब कांबळे यांनी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना तातडीचे पत्र लिहून ही मागणी केली आहे . कोरॉना साथीच्या पार्श्व भूमीवर केंद्र आणि राज्य सरकारचा निधी या परिस्थितीमध्ये कमी पडत असल्याचे दिसून येत आहे.असंघटित मजूर, बांधकाम कामगार शेतमजूर आणि कष्टकरी यांना रोजगार उपलब्ध नसल्याने त्यांच्या उपजीविकेचे साधन नष्ट झाले आहे.

Loading...

मोठ्या शहरात त्यांना राहणे आणि जेवणाच्या साधनांपासून वंचित रहावे लागत आहे. आगामी महिन्यात देखील हीच परिस्थिती कायम राहिल्यास या कष्टकऱ्यांच्या आणि कुटुंबीयांच्या जीवनावर गंभीर संकट ओढवणार आहे .त्यामुळे राज्य सरकारने निधी ची कमतरता असल्यास देवस्थानांचे निधी धर्मादाय आयुक्त कार्यालयामार्फत ताब्यात घ्यावेत आणि त्यांचा योग्य विनिमय कष्टकऱ्यांच्या सुविधांसाठी आरोग्यासाठी खर्च करावा, असे या पत्रकात म्हटले आहे. ही सामाजिक जबाबदारी न उचलणाऱ्या देवस्थानांच्या व्यवस्थापन समितीवर कारवाई करून प्रशासक नेमावा, असेही या पत्रकात म्हटले आहे.

हेही पहा –

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात