सौंदर्यात भर घाला फळांच्या मदतीने !

टीम महाराष्ट्र देशा : ऋतुमानानुसार बाजारात येणारी फळ फक्त उत्तम आरोग्यच नव्हे तर सौंदर्यवर्धकही आहे. तसचं ही फळ तुमचं सौंदर्य फुलवण्यास मदत करतात. फळ जसे आरोग्यासाठी महत्वपूर्ण मानले जातात. तसचं ते सौंदर्यसाठी देखील महत्वपूर्ण आहे.

फळांचे सौंदर्यसाठी चे फायदे :

संत्री : संत्र्याची साल उन्हात वळवून वस्त्रगाळ पूड करून ती दुधात कालवा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. तेलकट त्वचेस याचा फायदा होईल, तसेच चेहऱ्यावरचा रग उजळण्यास मदत होईल.

काकडी : त्वचा ब्लीच करण्यासाठी याचा रस चेहऱ्यावर चोळावा किवा चेहऱ्यावर काकडीच्या फोडी ठेवा आणि पंधरा मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा.

पपई : फार पूर्वीपासून पपईचा गर उपयुक्त सौंदर्य प्रसाधन  म्हणून वापरत आहे. पपईचा गर चेहऱ्यावर चोळल्यास डाग.पुरळ कमी होण्यास मदत होते. यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते.

खरबूज : शुष्क त्वचेसाठी खरबुजाच्या गरात एका अंड्याचा पांढरा भाग आणि थोडी मिल्क पावडर घाला. आणि हे मिश्रण चेहऱ्यावर लावा.त्वचा राठ असल्यास खरबूजाचा गर लावल्यास फायदा होतो.

सफरचंद : सफरचंदाच्या रसात थोडे गुलाबजलाचे थेंब घालून चेहऱ्यावर लावा किवा सफरचंदाचा गर उकडून तो लावा, त्यानंतर चेहरा स्वच्छ  धुवा. सावळा रंग उजळण्यास मदत होईल.