Hair Care | टीम महाराष्ट्र देशा: स्त्री असो वा पुरुष प्रत्येकाला दाट आणि मजबूत केस (Hair) हवे असतात. पण बदलत्या जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या अभावामुळे केस गळायला लागतात. त्याचबरोबर केसांची योग्य ती निगा न राखल्यामुळे केसांमध्ये कोंडा आणि केस गळण्याची समस्या वाढत जाते. अशा परिस्थितीमध्ये लोक बाजारात उपलब्ध असलेले विविध प्रकारचे केमिकलयुक्त उत्पादन वापरतात. पण अनेकदा या उत्पादनामुळे केसाच्या समस्या कमी होण्याऐवजी वाढायला लागतात. त्यामुळे केसांची योग्य निगा राखण्यासाठी नैसर्गिक पद्धतीने केसांची काळजी घेतली पाहिजे. यासाठी तुम्ही कापुराचा वापर करू शकतात. कारण कापुरामध्ये एंटी फंगल आणि अँटिबॅक्टरियल गुणधर्म आढळतात. हे गुणधर्म केसांना नैसर्गिक रित्या निरोगी ठेवण्यास मदत करतात. केसांची निगा राखण्यासाठी तुम्ही पुढील पद्धतीने कापुराचा उपयोग करू शकतात.
केसांना (Hair) दाट आणि मजबूत बनवण्यासाठी कापुराचा ‘या’ प्रकारे करा वापर
कापूर आणि खोबरेल तेल
कापूर आणि खोबरेल तेलाचा वापर केल्याने केस गळती आणि टक्कल पडण्याची समस्या दूर होऊ शकते. त्यासाठी तुम्हाला कापूर आणि खोबरेल तेल दोन्हीही समान प्रमाणात मिक्स करून घ्यावे लागेल. हे मिश्रण तयार झाल्यावर तुम्हाला ते टाळूवर आणि केसांवर हलक्या हाताने लावावे लागेल. कापूर आणि खोबऱ्याच्या तेलाच्या मिश्रणाने नियमित मसाज केल्याने केस गळतीची समस्या दूर होऊ शकते.
कापूर आणि अंडी
केस मजबूत आणि चमकदार बनवण्यासाठी कापूर आणि अंडी उपयुक्त ठरू शकतात. यासाठी तुम्हाला कच्च्या अंड्यामध्ये कापूर मिसळून घ्यावा लागेल. तयार झालेले हे मिश्रण तुम्हाला केसांच्या मुळावर दहा ते पंधरा मिनिटे लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या नियमित शाम्पूने केस धुवावे लागतील. नियमित कापूर आणि अंड्याचा उपयोग केल्याने तुमचे केस मजबूत आणि चमकदार होतील.
कापूर आणि कोरफड
केस मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही कापूर आणि कोरफडीचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला कापूर आणि कोरफड समान प्रमाणात घेऊन मिक्स करून घ्यावी लागेल. तयार झालेले हे मिश्रण तुम्हाला केसांच्या मुळाला दहा ते पंधरा मिनिटे लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या नियमित शॅम्पूने केस धुवावे लागेल. कापूस आणि कोरफडीच्या नियमित वापराने केसातील कोंड्याची समस्या दूर होते.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
- IND vs SL | श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेमध्ये विराटची जागा घेणार ‘हा’ खेळाडू?
- OnePlus Mobile | भारतात लवकरच लाँच होऊ शकतो OnePlus 11 5G, जाणून घ्या फीचर्स
- Salman Khan | “एकाच फ्रेममध्ये दोन…”; सलमानच्या वाढदिवसानिमित्त शाहरुखच्या उपस्थितीवर चाहत्यांची प्रतिक्रिया
- Weather Update | राज्यात तापमानात घसरण, तर हरियाणामध्ये 2.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
- Devendra Fadnavis | मुंबईतील अतिधोकादायक इमारतींना स्वयंपुनर्विकास करण्याची परवानगी देणार – उपमुख्यमंत्री