पुणे: भाजपचे पूर्वाश्रमीचे नेते, माजी महसूलमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले आहेत,’वापरा आणि फेकून द्या असे भाजपाचे धोरण आहे.’ शिवाय त्यांनी पुन्हा एकदा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. गुरुवारी पिंपरी-चिंचवडमधील एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. ते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये म्हणून त्यांना बाजूला करण्यात आलं, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात असा गंभीर आरोप भाजपच्या राज्यातील नेतृत्वावर केला आहे. भाजपच्या या धोरणाचं उदाहरण म्हणून त्यांनी लालकृष्ण अडवाणींचाही उल्लेख केला.
महाराष्ट्राच्या ६२ वर्षाच्या वाटचालीत कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई येथील मुख्यमंत्री झाले, मराठवाडयाचे दोन- तीन मुख्यमंत्री झाले, पण खानदेशचा एकही मुख्यमंत्री झाला नाही. आणि एखादा माणूस तिथंपर्यंत पोहचला तरी त्याला होऊ दिले नाही. अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. पुढे ते म्हणाले की, “स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यासह माझ्यासारख्या अनेक नेत्यांनी ओबीसींसाठी न्याय मागितला. ४० वर्षे ओबीसींसाठी संघर्ष केला. परंतु, भाजपाने मतांसाठी ओबीसी नेत्यांचा वापर केला. आज ते नेते कुठे आहेत? अशा अनेक कारणांसाठी पक्ष सोडून राष्ट्रवादीत यावं लागलं.”
देवेंद्र फडणवीस आपल्या माणसाची चौकशी मागणी करत नाहीत. त्यांनी पिंपरी महानगर पालिकेत झालेला भ्रष्टाचार हा विधानसभेत मांडावा. पण, इतरांकडे ते बोट दाखवतात. भ्रष्ट्राचार विरोधात आपला परका असं काही नसत जे घडलं आहे त्याच्या विरोधात चौकशी करण्याची मागणी केली पाहिजे,” असंही खडसे म्हणाले. आमचं सरकार आल्यावर सर्व एक एक करून आत जातील, असा इशारा त्यांनी भाजपच्या नेत्यांना दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<