मास्क वापरा हा संदेश देण्यासाठी मार्क झुकरबर्ग यांनी ठेवला खास फोटो

नवी दिल्ली : मार्क झुकरबर्ग हे फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे सर्वेसर्वा व निर्मात्यांपैकी एक आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी फेसबुकवर एक खास प्रोफाइल फोटो अपडेट केला आहे.हा फोटो स्वतःच्या फोटोचे कार्टूनरुपी रूपांतर करण्याच्या सद्याच्या ट्रेंड ला अनुसरून असून, यातून मार्क यांनी सर्व वापरकर्त्यांना एक सामाजिक संदेश देखील दिला आहे.

जगभरातील कोरोना बाधितांची संख्या हि १ कोटी १८ लाखांच्या घरात गेली आहे. सुरुवातीला चीनच्या वुहान शहरातून प्रसारित झालेल्या या रोगाने बघता बघता संपूर्ण जग व्यापले. ५ लाखांहून अधिक लोकांना या रोगामुळे आपला प्राण गमवावा लागला. हीच गांभीर्यता लक्षात घेता जगभरात डॉक्टरांनी काही मार्गदर्शिका जाहीर केल्या होत्या. ज्यात सोशल डिस्टनसिंग, मास्कचा वापर, वारंवार हात धुणे याचा समावेश होता.

डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मास्क हा अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळेच wear a mask म्हणजेच मास्क घाला, हा संदेश त्यांनी या प्रोफाइल फोटो मध्ये स्वतः च्या कार्टूनरुपी फोटोमध्ये मास्क घालत दिला आहे. दरम्यान, व्हाट्सऍप व इंस्टाग्राम हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म देखील मार्क झुकरबर्ग यांच्या फेसबुक या कंपनीच्या मालकीचे आहेत.

राजगृहावरील हल्ल्याचा मनसेकडून निषेध; ‘आमच्या प्रज्ञास्थळावर, महाराष्ट्रधर्मावर हल्ला’

‘जे एका भावाला नाही जमल ते अजितदादांनी शब्दासाठी करून दाखवले…’

भाजपाच्या दडपशाहीला आम्ही घाबरत नाही- थोरात

IMP