उसेन बोल्टचं कोहलीला मजेशीर ट्विट ; ए.बी डिव्हिलियर्स म्हणतो…

उसेन बोल्ट

मुंबई : येत्या 9 एप्रिलपासून इंडियन प्रीमियर लीगचे 14 वे सीजन सुरु होणार आहे. भारतीय खेळाडू देशातील लोकप्रिय असलेल्या आयपीएलसाठी सज्ज झालेत. येत्या ९ एप्रिल पासुन आयपीएलचे १४वे सत्र सुरु होत आहे. यावर्षीचा आयपीएलचा सलामीचा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर  यांच्यात होणार आहे.

आयपीएल सुरु होण्यासाठी अवघा एक दिवस राहिला आहे. चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. चाहत्यांसोबत खेळाडू देखील आयपीएल साठी उत्सुक आहेत. यावेळी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे खेळाडू देखील उत्सुक असल्याचे दिसत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा खेळाडू उसेन बोल्टने रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुची जर्सी परिधान करत विराट कोहलीसाठी  खास मेसेज पाठवला आहे. हा मेसेज ट्विट करताना त्याने विराट आणि ए बी डिव्हिलियर्सला टॅग केलं होतं. डिव्हिलियर्सनेही उसेन बोल्टची कमेंट रिट्विट केलं आहे.

उसेन बोल्टने आरसीबीची जर्सी परिधान करून एक मजेशीर ट्विट केलं आहे. या फोटोत त्याने विराट कोहली आणि ए बी डिव्हिलियर्स यांना टॅग करुन. ‘चॅलेंजर्स फक्त आपल्या माहितीसाठी सांगतोय,आताही जगातला सगळ्यात वेगवान धावपटू मीच आहे’, बोल्टच्या या ट्विट नंतर डिव्हिलियर्सनेही बोल्टला मजेशीर रिप्लाय केला. ‘आम्हा सगळ्यांना माहितीय की आम्हाला जर एक्स्ट्रा रन्स पाहिजे असतील तर कुणाला बोलवायचं.’ या ट्विट नंतर आरसीबीने देखील ट्विट करुन उसेनला भारत भेटीचं निमंत्रण दिलंय. ‘लाल रंग तुला फार सूट करतोय. लवकरच भारतासाठी विमान पकड, आम्ही तुझी वाट पाहतोय’, असं ट्विट बंगळुरुने केलं आहे.

महत्वाच्या बातम्या