डाळिंब खा…………निरोगी राहा ! – जाणून घ्या डाळिंब खाण्याचे फायदे

टीम महाराष्ट्र देशा : ‘ईचक दाना, बिचक दाना दाने ऊपर दाना, ईचक दाना’ डाळिंबाचं वर्णन करणारं हे गाणं आपल्या तोंडात चांगलंच बसलं आहे. महाराष्ट्रात अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली येथे डाळिंबाचं पिक घेतलं जातं. डाळिंबाच्या दाण्यांचाच नव्हे, तर साल, पाने, फुले, बिया, मुळं या सर्वच भागांचा औषधामध्ये वापर करतात.

उपयोग

– डाळिंबांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह मोठ्या प्रमाणात असतात.

– डाळींबाचे शरीरातीत रोगप्रतिकारक शक्ती वाढते,एवढंच नाही तर हिरड्या मजबूत करून दातांची दुर्घधी घालवण्यासही मदत होते.

– ताप आला असेल तर डाळिंब खावे, तापामुळे शरीरामध्ये वाढलेली उष्णता त्यामुळे कमी होते.

– डाळिंब हे रक्तवर्धक आणि शक्तिवर्धक आहे, ज्यांना रक्ताची कमतरता म्हणजे अनिमिया आहे. त्यांनी रोज एक डाळिंब खावे.

– डाळिंब खाल्याने भूक लागण्याचे प्रमाण वाढते.वजन कमी करण्यासही डाळिंब ज्युस महत्वाचा ठरतो.

– त्वचा निरोगी राखण्यासाठी डाळिंब महत्वाची भूमिका बजावते.

– अपचन, पोटात गॅस होणे, शौचास साफ न होणे या तक्रारींवर डाळिंब फायदेशीर ठरते.

– जुलाब होत असतील तर डाळिंबाच्या सेवनाने ते लगेच थांबतात.

– डाळिंबाचा रस प्यायल्यानं रक्ताभिसरण क्रिया सुधारते.

पण डाळिंब सोलल्यानंतर त्याचे दाणे लगेचच खाणे आवश्यक आहे कारण दाणे उशिरा खाल्यानंतर त्यातील पोषक घटकांचे प्रमाण कमी होते. त्याचप्रमाणे स्वाद व चवही कमी होते.