fbpx

‘अमेरिकेने तयार केले जगातील सर्वात मोठे विमान’

टीम महाराष्ट्र देशा :जगातले सर्वात मोठे विमान अमेरिकेत तयार करण्यात आले आहे आणि त्याला ‘रॉक’ (Roc) हे नाव देण्यात आले आहे.

या विमानाची प्राथमिक चाचणी कॅलिफोर्निया (अमेरिका) येथील मोझेव वाळवंटात घेण्यात आली आणि तेथून पहिली हवाई चाचणी घेतली गेली.

या विमानाला अमेरिकेच्या स्ट्रेटोलॉन्च सिस्टम्स कॉर्प. या कंपनीने तयार केले आहे. या विमानाची लांबी फुटबॉल मैदानाच्या बरोबरीत आहे.

त्याच्या पंखाची लांबी ११७  मीटर एवढी आहे. याची संरचना जोडलेले दोन विमान (म्हणजेच ट्विन फ्यूजलेज) असतात त्याप्रमाणे आहे. यात सहा बोइंग-७४७  इंजिन बसविण्यात आले आहेत.