डोनाल्ड ट्रम्प यांनीही ठेवले मोदींच्या पावलावर पाऊल;चीनला दिला तगडा झटका

donald trump narendra modi

वॉशिंग्टन : भारतात बंदी घालण्यात आलेल्या काही चीनी अ‍ॅप्सवर अमेरिकेने देखील बंदी घातली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉक आणि व्हीचॅटसारख्या चायनीज अ‍ॅप्सवर बंदी घालण्याच्या आदेशावर आज स्वाक्षऱ्या  केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थोच्या रिपोर्ट्सनुसार, चीनी अ‍ॅप्समुळे अमेरिकेची ‘सुरक्षा’ धोक्यात आल्याचे सांगत त्यांनी ही कारवाई केली आहे.

चीनविरोधात सातत्याने आक्रमक पवित्रा घेतलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी अ‍ॅप टिकटॉक आणि वीचॅटचे मालकी हक्क असलेल्या कंपनीसोबत कोणताही व्यवहार करण्यास बंदी घातली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी इमरजन्सी इकॉनॉमिक पॉवर अॅक्ट अंतर्गत या आदेशाला मंजुरी दिली. बाईट डान्स या कंपनीकडे टिकटॉक आणि वीचॅटचे मालकी हक्क आहेत. या आदेशानंतर नंतर अमेरिकेत टिकटॉक आणि वीचॅटवर बंदी लागेल.

या अ‍ॅप्समुळे देशाच्या सुरक्षेला धोका असल्याचं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. त्यामुळे तातडीनं दोन्ही अॅपसोबत असणारे अमेरिकेचे व्यवहार थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. tik tok चालवणारी बाईटडान्स कंपनी 45 दिवस अमेरिकेसोबत कोणतेही आर्थिक व्यवहार करणार नाही अशी माहिती मिळाली आहे.

ट्रम्प यांनी सांगितले की, डेटा गोळा केल्याने चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला अमेरिकन नागरिकांच्या खासगी आयुष्याची माहिती मिळते. याद्वारे चीन अमेरिकेच्या कर्मचारी आणि ठेकेदारांचे स्थान ट्रॅक करू शकणार आहे. एवढेच नाही तर याचा वापर चीव ब्लॅकमेलिंगसाठीही करू शकतो. तसेच कार्पोरेट हेरगिरीही करण्याचा धोका आहे.

दरम्यान, नुकताच Google ने देखील चीनला दणका दिला आहे. चीन संबंधित जवळपास २५०० हून अधिक यूट्यूब चॅनेल डिलीट केले आहेत. या चॅनेल्सवरून भ्रमित माहिती पसरवली जात होती. त्यामुळे गुगलने व्हिडिओ शेयरिंग प्लॅटफॉर्मवरून हटवले आहे.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

… म्हणून होतेय एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची जोरदार मागणी

मोठी बातमी: इंदुरीकर महाराजांची आज कोर्टात महत्वाची सुनावणी